प्रत्येक भागात उद्योग प्रक्रिया सुरुवात झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी आपली शेती एक बिजनेस म्हणून करावी आपण मोठ्या कष्टाने शेतात उत्पन्न घेतो पण त्याचे वितरण होण्यासाठी कुष्णूर एमआयडीसीमध्ये विविध उद्योग निर्माण झाले तरच त्याचा पुरेपूर फायदा शेतकऱ्यांना होईल असे मत खा. प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांनी महालक्ष्मी हळद प्रक्रिया उद्योग शुभारंभ कार्यक्रमात व्यक्त केले.
महालक्ष्मी हळद प्रक्रिया उद्योगाचे अध्यक्ष तथा नगरसेवक दयानंद भालेराव यांनी निर्माण केलेल्या महालक्ष्मी हळद प्रक्रिया उद्योग या फर्मचा शुभारंभ सोहळा प्रसंगी उद्घाटक म्हणून खासदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण यासह श्रीनिवास पाटील चव्हाण, उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, सय्यद रहीम शेठ, डॉ. शंकर गड्डमवार, बालाजी मद्देवाड, माधवराव पाटील जाधव, संजय पाटील चव्हाण,रावसाहेब पाटील जाधव, पंढरीनाथ भालेराव, रवींद्र भालेराव, विजय भालेराव सूर्यकांत सोनखेडकर, रा.ना. मेटकर, उत्तम गवाले, शंकर गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये महालक्ष्मी हळद प्रक्रिया उद्योगाचे शुभारंभ करण्यात आले. दयानंद भालेराव कुटुंबाच्या वतीने मान्यवर व पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला, आपल्या प्रस्ताविकपर मनोगतात नगरसेवक भालेराव म्हणाले की, मी एक शेतकरी असल्याने हळद उत्पन्न घेतले पण त्याच्या वितरणासाठी काय त्रास झाला हे लक्षात आल्यानंतर इतर शेतकऱ्यांना असा त्रास होऊ नये यासाठी महालक्ष्मी हळद प्रक्रिया उद्योग निर्मिती करण्यात आली आपण सर्वांनी मला सहकार्य करावे असेही त्यांनी अपेक्षा केली.
यावेळी, प्राचार्य बाबासाहेब शिंदे, नगरपंचायत नायगाव येथील लेखापाल रामेश्वर बापूले, माधवराव पाटील पळसगावकर, माणिक पाटील चव्हाण, प्रल्हाद पाटील होटाळकर सरपंच रणजीत पाटील कुरे,बाजीराव पाटील हिप्परगेकर, तेजराव पाटील चोंडे, कामाजी वाघमारे, शकील शेठ,पंडित तेलंग, संतोष गाडगेराव, इंजी. स्वप्निल भालेराव खादी ग्रामोद्योगाच्या माजी सदस्या सौ माधवी भालेराव,कु.कल्याणी भालेराव, लक्ष्मीकांत भालेराव यासह कुष्णूर परीसरासह नायगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांची उपस्थिती होती सदर कार्यक्रमांची सूत्रसंचालन व आभार मुख्याध्यापक उत्तम गायकवाड यांनी मानले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy