मिलिंद बच्छाव याना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने केले सन्मानित !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
  दिशाशक्ती मिडिया समूहाने वैद्यकीय, प्रशासकीय,सहकार , सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक , उद्योग, कृषि, पत्रकारिता, आरोग्य , अध्यात्मिक, पर्यावरण आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवर व्यक्तींचा विशेष कार्य सन्मान करून भावी वाटचालीस तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्याना अधिकची प्रेरणा मिळण्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा अण्णासाहेब शिंदे सभागृह मफुकृवि राहुरी येथे संपन्न झाला.
       या कार्यक्रमात दिशाशक्ती चे नांदेड जिल्हा प्रतिनिधी मिलिंद बच्छाव यांच्या कार्याची दखल घेऊन दिशाशक्ती समूहाने बच्छाव याना शाल , श्रीफळ, प्रशस्तीपत्र , सन्मानचिन्ह , मेडल देउन ” उत्कृष्ट पत्रकारिता ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यांना सन्मानित करण्यात आल्याने मंगेश हनवटे केंद्र प्रमुख तथा गट समन्वयक पंचायत समिती नायगाव , व्यंकटराव काळेवार सामाजिक कार्यकर्ते , शंकर सुर्यकार , कांडाळाचे माजी सरपंच मारोती कांबळे आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
             यावेळी मा.खा. निलेशजी लंके (खासदार नगर दक्षिण) , मा.आ. प्राजक्तदादा तनपुरे माजी राज्यमंत्री तथा आमदार, राहुरी पै. रावसाहेब (नाना) खेवरे जिल्हाध्यक्ष शिवसेना (उ.बा.ठा.), शरद सबाजी बाचकर प.महा. अध्यक्ष रासप, ह.भ.प.डॉ.अण्णासाहेब बाचकरग माजी उपसभापती कृ.उ.बा.स राहुरी, अविजयराव तमनर, यशवंत सेनारामदास बाचकर संचालक कृ.उ.बा.स., आयोजक रमेश गंगाधर हेमनर दिशाशक्ती समूह , बाळकृष्ण कोकाटे मुख्य संपादक दिशाशक्ती मिडिया समूह यांची प्रमुख उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या