तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत मिलिंद विद्यालय तालुक्यात सर्व प्रथम  

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
         बिलोली तालुकास्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धेचे आयोजन श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल सगरोळी येथे करण्यात आले,या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल सगरोळीचे मुख्याध्यापक गायकवाड सर ,तालुका क्रीडा संयोजक नंदूजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळेस तालुक्यातील विविध शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
त्यात 14 वर्ष वयोगटातील खो खो चा अंतिम सामना हा सगरोळी येथील छत्रपती शिवाजी हायस्कुल व मिलिंद विद्यालय कुंडलवाडी यांच्यात लढत होऊन तो सामना मिलिंद विद्यालयाच्या संघाने जिकून तालुक्यातुन प्रथम येण्याचा मान मिळविला आहे तर 17 वयो गटाखालील संघाने द्वितीय क्रमांक पटकाविले आहे.या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कुणाल एस.लोहगांवकर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.एम.एस.खंदारे एच.एन.पांचाळ,सी.ए. कुंडलवाडीकर, शेख सलीम,संभाजी गायकवाड,आदींसह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या