मिलिंद विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल 92.17 टक्के ; सेमी विभागाचा निकाल 100 टक्के !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
येथील सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मिलिंद विद्यालय कुंडलवाडी या शाळेचा यंदाचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल एकूण 92.17% तर सेमी विभागाचा निकाल 100 टक्के लागला असून शाळेने यंदाही सेमी इंग्लिश चा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. इयत्ता दहावी परीक्षेत यावर्षी एकूण 115 विद्यार्थी बसले होते त्यापैकी 106 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल 92.17% इतका लागलेला आहे.
यामध्ये विशेष प्राविण्यासह 38, प्रथम श्रेणीत 42, द्वितीय श्रेणीत 23, तर 03 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतून कु. निशिगंधा दिगंबरराव साखरे ही 95.60% गुण घेऊन प्रथम, कु. स्नेहल संतोष चव्हाण ही 91.60% गुण घेऊन द्वितीय, तर कु. संजना दत्ता दुप्तले ही 91.20% गुण घेऊन तृतीय आली आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कुणाल लोहगावकर, संचालक विजयकुमार लोहगावकर शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एच. एन. पांचाळ ,प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक डी.एस. पांचाळ यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या