[ नायगांव ] – नायगांव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड मताने विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ.मिनाताई सुरेशराव पाटील कल्याण यांचा भव्य सत्कार सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांच्या वतीने नुकताच अभिनंदनपर करण्यात आला.
यावेळी सुरेशराव पा.कल्याण, सौ.रेणुकाताई सुभाषराव पाटील कल्याण, उपस्थित होते. त्यांचं अभिनंदन व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते , व्यापारी बांधव मित्र परिवार आदिंनी उपस्थिती लावून कल्याण पाटील परिवारावरील स्नेह कायम असल्याचे दाखवून दिले.
सत्कार प्रसंगी प्रामुख्याने डॉ.गजानन पाटील गडगेकर, बालाजी पाटील देसाई, दिलीप पाटील कल्याण, भगवान पाटील ( कानोले) जिगळेकर, विश्वनाथ पाटील खराडे, शिरोळे साहेब, संजय सा. आरगुलवार, जय भीम मित्र मंडळाचे अध्यक्ष गौतम वाघमारे, संत रविदास मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे, पञकार चंनदनकर साहेब, पञकार शिवाजी ईबितदार, काशीनाथ भोकरे, नरसिंग पोतदार, प्रल्हाद वंगरवार, नारायण पोतदार, संदिप कोकूलवार, शेषेराव वाघमारे, संग्राम बेलकर, बळेगांवरकर पांचाळ, यांच्या सह आदी उपस्थितांनी त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर म्हणाले गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत दलित, पददलित, उपेक्षित, वंचित, घटकावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात बुलंद आवाज उठवणारे सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी खंबीरपणे पाठीमागे उभे टाकून विविध समाजाच्या कल्याणासाठी राजकीय व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या संघर्षशील नेत्या तथा माझ्यावर नेहमी मातृत्वाची छाया ठेवणारे प्रेमळ आदर्श आदरणीय सौ.मिनाताई पाटील कल्याण असं व्यक्तिमत्त्व आहेत.
असे मत सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी व्यक्त करुन त्यांचे अभिनंदन केले व मित्र मंडळाच्या वतीने भव्य सत्कार करून पुढील राजकीय वाटचालीसाठी पांचाळ परिवाराच्या व मित्र मंडळाच्या वतीने शुभेच्छाही दिल्या.
*वाचत रहा मास महाराष्ट्र न्युज* www.massmaharashtra.com
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy