खा.चिखलीकर यांच्या निधीतून शतरंजी गल्लीत इंधन विहीर ; प्रभाग 5 मधील नागरीकांचा पाणी प्रशन सुटला.

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
जिल्हाचे विकासाभिमूख खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या खासदार क्षेत्र विकास निधी अंतर्गत शहरातील अल्पसंख्याक प्रभाग पाचमध्ये बोर मारण्यात आला. यामुळे प्रभागातील नागरिकांच्य पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
प्रभागात बोर मिळावा यासाठी बिलोली-देगलूरचे माजी आमदार सुभाष साबणे, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, माजी नगर उपाध्यक्ष डॉ. विठ्ठल कुडमूलवार यांनी शिफारस तर मोहम्मद आफजल यांनी पाठपुरावा केले होते.त्या अनुषंगाने दि.१६ डिसेंबर शनिवार रोजी प्रभाग क्रमांक पाच मध्ये इंधन विहीर (बोर) मारण्यात आले.
यामुळे अल्पसंख्याक प्रभागातील नागरीकांचा पाण्याचा प्रशन सुटला, नागरीकांनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे आभार मानले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष हणमंलू ईरलावार, मोहम्मद अफजल, सपोनी.विश्वात कासले, नगर परिषद मुख्याधिकारी प्रतिनिधी हेमचंद्र वाघमारे, माजी. शहराध्यक्ष शेख जावेद, माजी नगरसेवक पंढरी पुपलवार, शेख वहाब सिराजोदीन, प्रभागातील जेष्ठ नागरीक पानसरे महाविद्यालयाचे संचालक अहेमद गौससेठ,मोहम्मद ईसमाईल सेवानिवृत्त मुख्याध्यापक जलालखॉन पठाण, नजीर भाई पठाण,राहुल गडपवार, शेख जब्बार, शुभम ढिल्लोड, विलास पाटील जवळेसह प्रभागातील नागरीक उपस्थित होते.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या