तुम्ही पन्नास वर्षांत जे केलं नाही ते आम्ही पाच वर्षांत केलं खासदार चिखलीकरांचा खतगावकरांना टोला.

( बिलोली प्र – सुनिल जेठे )
बिलोली तालुक्यातील गागलेगाव, दुगाव, आरळी, लघुळ विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी या गावांमध्ये जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, विधानपरिषद आमदार राम पाटील रातोळीकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले.

 तालुक्यातील मौजे गागलेगाव येथे १ कोटी ५५ लाख रुपयांचे जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा नळ योजना, पेव्हर रस्त्याचे काम, तार कंपाऊंड, डीपीचे उद्घांटन, मौजे दुगाव येथे १ कोटी ३२ लाख रुपयांची हर घर जल योजना, सी.सी रस्ता उद्घाटन, मौजे गुजरी २ कोटी १० लाख रुपयांचे – कोळगाव गुजरी – दिग्रस गट ब मधील रस्त्याचे उदघाटन, लघुळ येथे पांदन रस्ता, जलजिवन मिशन अंतर्गत योजनांचे भुमिपुजन केले.

या कार्क्रमात बोलताना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की, देशाचे नेते दुरदृष्टी ठेऊन महिलांसाठी चालु केलेल्या उज्वला योजना, हर घर जल योजना, महिला सक्षमीकरणासाठी ऊत्कृष्ठ योजना आहेत.

विकास हा शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. मोदींच्या नेतृत्वात रस्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. याही पुढे विकासाची गंगा अविरत चालुच राहील. पुढे ते म्हणाले या भागातुन जनतेच्या जोरावर माजी मंत्री, माजी आमदार माजी खासदार, दाजी व भाऊजी नी पन्नास वर्षांत किमान एक किलोमीटर तरी राष्ट्रीय महामार्ग आनला का? असा सवाल केला.  त्यावेळी जनतेतून टाळ्यांचा पाऊस सुरू झाला. या भागाचे नेतृत्व करताना दाजी भाऊजीनी फक्त जनतेची दिशाभूल करण्यापलीकडे काहीच केले नाही असा चिमटाही चिखलीकरांनी काढला.
या प्रसंगी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हा अध्यक्ष व्यंकटराव पा.गोजेगावकर, जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, जिल्हा परिषद सदस्य मानिकराव लोहगावे, जिल्हा उपाध्यक्ष उमाकांतराव गोपछडे, व्यंकटराव पाटील गुजरीकर, तालुका अध्यक्ष श्रीनिवास नरवाडे पाटील, शंकरराव काळे, शिवाजीराव कनकंटे, यशवंत गादगे, संभाजी शेळके, कासराळी ग्रा.पं.चे माजी सरपंच अरविंद ठक्करवाड, भाजपा युवामोर्चाचे ता.अध्यक्ष इंद्रजित तुडमे, शांतेश्वर पाटील, संजय भोसले पाटील, मारोती राहीरे, बळवंत पाटील लुटे, राजेंद्र रेड्डी (तोटावाड)अनु.जाती चे ता.अध्यक्ष बाबू कुडके, राजकुमार गादगे आहे.
गागलेगाव च्या सरपंच ऊषाताई जिंके, धोंडू सावकार, व्यंकट गुज्जरवाड, दुगावच्या सरपंच पार्वतीबाई जाधव, उपसरपंच अनुताई जाधव पाटील, माजी सरपंच बालाजी पा.कदम, गागलेगाव, दुगाव, गुजरी, आरळी, लघुळ येथील सरपंच व सर्व सदस्य, नागरीक, गावकरी, पत्रकार सययद रियाज, सुनिल जेठालकर (जेठे) यांच्यासह भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या