मिनकी तालुका बिलोली येथील दुहेरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांत्वन पर भेट देण्यात आली. गरीबी आणि शिक्षणाच्या बाजारीकरणाला बळी पडलेल्या बिलोली तालुक्यातील मिनकी येथील पीडित पैलवार कुटुंबाला आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भेट देऊन सांत्वन करण्यात आले.
मिनकी येथील बाप लेकाने आत्महत्या केलेल्या घटनेला आज तब्बल चार दिवस उलटून गेले असले तरी कुठल्याही लोकप्रतिनिधींनी या पीडित कुटुंबाला भेट दिली नसल्याची कैफियत या कुटुंबातील सदस्यांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद आणि जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांचेसमोर व्यक्त केली.
आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मिनकी येथील मयत राजेंद्र पैलवार, ओमकार पैलवार यांच्या कुटुंबांना भेट दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या पिढीत कुटुंबाला या दुखातून सावरण्यासाठी तातडीची आर्थिक मदतही करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव शाम कांबळे , जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन, तालुका अध्यक्ष धम्मदीप गावंडे यांची उपस्थिती होती.
सातत्याने नैसर्गिक आपत्ती आणि सरकारचे शेतकऱ्यांविषयी असलेले उदासीन धोरण यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती त्यातही अल्पभूधारक शेतकऱ्यांची स्थिती अगदीच हालाखीची झाली आहे.
शिक्षणासाठी गाव सोडून लेकरांना पन्नास- शंभर किलोमीटर दूर अंतरावर शिकायला ठेवले. सणासुदीच्या निमित्ताने मुलं घरी आली. मुलांनी शिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी केली. अंगावर नवीन कपडे असावे अशा मुलांनी वडिलांकडे आग्रह केला, परंतु आर्थिक हातलब असलेल्या बापाला मुलाच्या अत्यावश्यक व अगदी किरकोळ असलेल्या मागण्या देखील पूर्ण करता आले नाहीत. दहावीत शिकणाऱ्या ओमकार याने ही बाब मनाला लावून घेतली. आणि सकाळी शेतात जाऊन त्याने गळफास घेतला. थोड्यावेळाने शेतात गेलेल्या राजेंद्र पैलवार या त्याच्या वडिलांनी शेतात आपला मुलगा झाडाला लटकला आहे हे लक्षात येताच त्याला खाली उतरून पश्चातापाच्या व एकूणच आर्थिक तंगीला कंटाळून त्यानेही मला पाठोपाठ गळफास घेतला. ही बाब महासत्ता बनू पाहणाऱ्या इथल्या व्यवस्थेला केवळ चपराक नाही तर ती आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारी आहे.
आज वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने या पीडित कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले जमेल ती आर्थिक मदत केली आणि आगामी काळात मयत ओंकार यांच्या भावंडांच्या शिक्षणासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy