[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
पोच्चम्मागल्ली येथील रहिवासी पोषटी सायन्ना गोनेलवार वय 75 वर्ष राहणार कुंडलवाडी हे हरवल्याची तक्रार त्यांचा मुलगा संजय पोषटी गोनेलवार यांनी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात केले आहे त्यानुसार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 कुंडलवाडी येथील पोचम्मागल्ली येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक पोषटी सायन्ना गोनेलवार हे दिनांक 18 जानेवारी 2022 रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास धर्माबाद येथे दवाखान्यात जाऊन येतो म्हणून घरातून निघून गेले ते आजतागायत पर्यंत अद्याप घरी परत आले नाहीत,त्यांचा वर्ण काळा सावळा,चेहरा लांबट,उंची साडेपाच फूट,अंगात पांढरा शर्ट, पांढरे धोतर, बांधा सडपातळ,भाषा मराठी, हिंदी, तेलगू,अशी व्यक्ती आढळून आल्यास कुंडलवाडी पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी 9975802890 पोलीस हवालदार तैनात बेग 9823627012 मुलगा संजय गोनेलवार 9767722272 संतोष गोनेलवार 9096073154 यांच्याशी संपर्क साधावा.

*वाचत रहा मास महाराष्ट्र न्युज* www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या