मिशन यूपीएससी ग्रंथाच्या 100 पुस्तके आंबेडकरवादी मिशन विद्यार्थ्यांना दान.

[ विशेष प्रतिनिधी – जयवर्धन भोसीकर ]
डॉ.सुयश चव्हाण IFS यांच्या यूपीएससी परीक्षेमध्ये यश प्राप्त करण्याच्या यशस्वी प्रवासा संदर्भात.. पालकाचे अनुभव या संदर्भातून विद्यार्थी व पालकांना उपयुक्त राहील असे पुस्तक ( मिशन यूपीएससी ) डॉक्टर सुयश यांचे वडील डॉ.यशवंत चव्हाण व आई डॉ.सविता चव्हाण यांनी संयुक्त रीत्या लिहिले आहे.
या ग्रंथाच्या 100 पुस्तकांचे निशुल्क वितरण आंबेडकरवादी मिशन मधील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज रमाई जयंतीच्या निमित्ताने करण्यात आले.
याप्रसंगी डॉक्टर यशवंत चव्हाण, इंजि.प्रा.शिरसे, दीपक कदम – प्रमुख आंबेडकरवादी मिशन, शेषराव वाघमारे, अलका गायकवाड आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या