आमदार महेंद्र दळवी यांच्यावरील खंडणीचे आरोप बिनबुडाचे; काकडे कन्स्ट्रक्शन ने हवा काढली.

[ अलिबाग प्रतिनिधी : अभिप्राव पाटील ]
शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार महेंद्र दळवी यांनी खार बंदिस्ती ठेकेदार कडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे. अशी स्पष्ट कबुली आज प्रथमेश काकडे कन्स्ट्रक्शन कंपनीने दिली आहे .या कंपनीचे सुनील पाटील यांनी स्वतः याबाबत आमदार महेंद्र दळवी व शिवसैनिकांची माफीही मागितली आहे. पेण मध्ये सुमारे १४ कीलोमीटर खरबंदिस्तीचे काम सुरू आहे. हे काम प्रथमेश काकडे कन्स्ट्रक्शन कंपनी करीत आहे.
या कंपनी कडून शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र दळवी यांनी दोन कोटी रुपये मागितल्याचे वृत्त एका दैनिकात भाजपचे आमदार रवी पाटील यांच्या हवाल्याने प्रसिद्ध झाले होते.
मात्र कंपनीनेच हा दावा बिनबुडाचा असल्याचे आज सांगितले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश म्हात्रे. तालुकाप्रमुख तुषार मानकवळे, शहरप्रमुख सुधाकर म्हात्रे, प्रदीप वर्तक, शिवाजी म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, दिलीप पाटील, अच्युत पाटील, दीपष्री पोटफोडे उपस्थित होते.
आमदार रवी पाटील यांनी बेताल वक्तव्य करण्यापेक्षा राजकारणातून संन्यास घ्यावा असा टोला आमदार दळवी यांनी लगावला. तसेच शेकापचे जयंत पाटील .हेही वैफल्य ग्रस्त झाल्याने ते बिनबुडाचे आरोप करत असल्याची टीका देखील दळवी यांनी केली. दरम्यान, आमदार रवी पाटील. यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या बाबत आपण असे कोणतेही वक्तव्य नसून माझ्या नावाने बनावट व्हिडीओ व्हायरल केला जात असल्याचा दावा केला.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या