मतदार संघातील ट्रांसफॉर्मर दुरुस्ती व महावितरण डिव्हिजन मधील रिक्त पदे भरणे या प्रश्नी आज आमदार श्री राजेशभाऊ पवार साहेब यानी ऊर्जा मंत्री मा. ना. नितीन राउत यांची भेट घेतली
माझ्या नायगाव मतदार संघात मोठ्या प्रमाणात शेतातील DP चे ट्रांसफॉर्मर मागील तिन ते चार महिन्यापासुन ऑइल अभावी नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
महावितरण विभागाला या बाबतित बऱ्याच दिवसा पासून विचारपूस केली असता ट्रांसफॉर्मर साठी लागणारे ऑईल उपलब्ध नसल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आले.
या प्रकरणी त्वरित लक्ष घालून योग्य ती कारवाई तातडीने करावी व आमच्या शेतकरी बांधवाना ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून घ्यावे .
तसेच भोकर आणि देगलूर महावितरण डिवीजन मध्ये अनेक पदे रिक्त आहेत. त्यामूळे देखील महावितरणाच्या सेवेमध्ये खुप प्रमाणात अडथळे येत आहेत.
त्यामुळे ही रिक्त असलेली पदे आपण लवकरात लवकर भरल्यास महावितरणाची सेवा अधिक जलद गतीने ग्राहकांपर्यंत पोहचेल .
वरील दोन्ही विषयी आमदार राजेश पवार यांनी ऊर्जा मंत्री राउत साहेब यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा केली व ह्या समस्या लवकरात लवकर आपण सोडवाव्यात अशी विनंतीही केली .