आमदार राजेश पवार यांच्या गाडीवर रातोळी येथे अज्ञात हल्लेखोरांकडून हमला, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल !

माझ्या मतदारसंघातील सर्व सामान्य गोर गरीब मजुर, शेतकरी यांच्या हितासाठी अवैध धंद्या विरुद्ध, भ्रष्टाचार विरुद्ध  माझा लढा चालु असल्यामुळे हा हमला झाला असावा परंतु अशे कितीही हमले  माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर झाले तरि माझा लढा चालुच राहिल – आमदार राजेश पवार 
नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राजेश पवार साहेब यांची कार त्यांच्या आई ला पाहुण्यांकडून परत आणण्यासाठी रातोळी येथे गेली असता काही अज्ञात हल्लेखोरांनी कार वर हमला करून कार ची मागील काच पुर्णपणे फोडली.
आमदार राजेश पवार गाडी मध्ये आहेत असे समजुन कदाचित हा हमला केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या हल्ल्याच्या वेळेस राजेश पवार गाडी मध्ये न्हवते. ते प्रशासकीय कामानिमित्त मुंबई येथे असल्याचे समजते.
आमदार पवारांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा भारतीय जनता पार्टी नांदेड च्या वतीने जाहिर निषेध करण्यात येत आहे.
पोलिसांनी त्वरित तपास करून हल्लेखोरांनवर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजप तर्फे करण्यात आली आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या