आमदार राजेश पवार सह आदींनी दिली शिवानंद पांचाळ यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट !

[नायगांव बाजार – दि.५ नोव्हेंबर]
अविरत समाजसेवेचा वसा घेतलेल्या सामान्यांतील असामान्य, सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ नायगांवकर यांचे नायगांव शहरातील फर्म- शिवांश ज्वेलर्स, तथा संपर्क कार्यालय येथे आज दिपावली पाडवा पूजनाच्या निमित्ताने‌ नायगांव विधानसभेचे आमदार राजेश पवार साहेब, नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर, जिल्हा परिषद सदस्य माणिक दादा लोहगावे, श्रीहरी पाटील नरंगलकर, धनगर समाज युवा मल्हार सेना राज्याचे सरचिटणीस बालाजी पाटील नारे, अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष राजेश एन भांगे, डॉक्टर गजानन गडगेकर, डेबूजी युथ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शिवाजी ईबितवार, तेली समाज नांदेड जिल्हा अध्यक्ष रामकिसन पालनवार, हामंतराव कदम पिंपळगावकर , शंकर पाटील कल्याण, गजानन पाटील कल्याण, चंद्रकांत पाटील चव्हाण, माधव पाटील कल्याण, कैलास दादा भालेराव, विठ्ठल पाटील गवळी, चौधरी सावकार, गजानन पाटील चव्हाण, फुलारी समाजाचे सक्रिय कार्यकर्ते सचिन सुरेशराव फुलारी, विश्वनाथ पाटील खराडे, सामाजिक – राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी , मित्र परिवार , आदिंनी उपस्थितीत राहून दिपावली पाडवा पूजन करून दीपावली निमित्त शिवानंद पांचाळ यांना आशीर्वादासह सदिच्छा भेट दिले आहेत, यावेळी शिवानंद पांचाळ यांनी उपस्थित मान्यवरांचे सत्कार करून आभार व्यक्त केले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या