महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिक्षकांचा सत्कार।

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
कुंडलवाडी येथे ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला आहे.
याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक तथा जेष्ठ पत्रकार एन जी वाघमोडे, मिलिंद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक, सुभाष दरबस्तेवार, अमरनाथ कांबळे, प्रा.डाँ.माधव हळदेकर इत्यादी शिक्षकांसह पत्रकार शेख शमशौदीन,रुपेश साठे, यांच्याही सत्कार करण्यात आला.
यावेळी मनसेचे शहराध्यक्ष साहेबराव कोंडावार, सचिव महेश चौधरी, युवाध्यक्ष आनिकेत झंपलकर, राजेश हमंद,गंगाधर कल्यापुरकर, गंगाधर मुकेरवार इत्यादींची उपस्थिती होती.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या