मनसेचा “एक काॅल प्रॉब्लेम सॉल्व” अलिबाग तालुक्यात चर्चा !

[ अलिबाग तालुका प्रतनिधी – अभिप्राव पाटील ]
अलिबाग तालुक्यातील शहाबाज या परिसरातील मीटरसाठी पैसे भरून सुद्धा मीटर बसवण्यासाठी टाळाटाळ करण्याचे प्रकार राज रोज पणे सुरू आहेत या बाबत शहाबाज परिसरातील अनंत पाटील यांनी हा प्रकार मनसे शॅडो कॅबिनेट सदस्य देवव्रत विष्णु पाटील यांना सांगितला तो सारा प्रकार लक्षात घेता महावितरणच्या पोयनाड येथिल ऑफिस मध्ये जाब विचारण्यास गेले.परंतु तेथे ज्युनियर इंजिनियर उपस्थित नव्हते मग त्यांनी संबंधित वायरमनला मोबाईलवर संपर्क करून सगळा प्रकार सांगितला. आणि काम करायला लावले.

मनसे शॅडो कॅबिनेट सदस्य देवव्रत विष्णु पाटील यांनी सहा महिने रखडलेला काम एका दिवसात केलं. त्यानंतर योगेश ठाकूर आणि अनंत पाटील यांनी मनसे शॅडो कॅबिनेट सदस्य देवव्रत विष्णु पाटील यांचे आभार व्यक्त केले यालाच म्हणावे लागेल “एक काॅल प्रॉब्लेम सॉल्व” अशी चर्चा तालुक्यात होताना दिसत आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या