रखडलेले काम मनसे च्या दणक्याने दोन दिवसात पूर्ण; पाईप टाकुन रस्त्यालगत भराव केला व अपघातास कारणीभुत दगड हलविण्यात आला.

[ रायगड /अलिबाग – प्रतिनिधी अभिप्राव पाटील ]
पोयनाड नागोठणे राज्यमार्गावर मेढेखार येथे पावसाळ्यातील पाणी वाहण्याचा पाईप Extain चे करायचं काम अनेक दिवसा पासून रखडवले होते. या ठिकाणी खाली खोलगट भाग पड़ला असल्यामुळे कोणतेही ये जा करणारे वाहन खाली जाऊ नये यासाठी खबरदारी म्हणुन एक मोठा दगड रस्त्यालगत रस्त्याचे काम करणार्या कंत्राटदाराने ठेवलं होतं.

गेल्या दोन अडीच महीन्या पासुन तो दगड तेथेच असल्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनाना छोटे मोठे अपघात होत होते. याबद्दल सदर विचारणा करण्यात आली. रस्त्याची सध्या जबाबदारी p.w.d पेण चे अधिकारी डि. एम. पाटील यांच्याकडे असल्यामुळे या रखडलेल्या कामामुळे होत असलेल्या अपघातांबद्दल मनसेचे शॅडो कॅबिनेट सदस्य देवव्रत विष्णु पाटील यांनी डी. एम. पाटील यांना जाब विचारून अपघात होत असल्यामुळे सदर काम तातडीने करण्यास सांगितले.
रखडलेले काम मनसे च्या दणक्याने दोन दिवसात पाईप टाकुन रस्त्यालगत भराव केला व अपघातास कारणीभुत दगड हलविण्यात आला.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या