केंद्रसरकार इ. डी. सारख्या यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचे प्रयत्न करत आहे – डॉ मोईज शेख

[ रायगड म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे ]
म्हसळा तालुका काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. नाना पटोले यांच्या आदेशानुसार आणि रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार तहसील कार्यालय म्हसळा समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी व राहुल गांधी यांना राजकीय हेतूने व आकस बुद्धीने इ. डी . ची नोटीस देऊन कार्यालयात बोलावून अपमानजनक वागणूक दिल्याच्या निषेर्धात देशातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी केंद्र शासनाचा तीव्र निषेध करत आहे. या प्रसंगी बोलताना म्हसळा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष डॉ. मोईज शेख असे म्हणाले कि नॅशनल हॅराल्ड या प्रकरणाची आर्थिक चौकशी 2016 सालीच पूर्ण करण्यात आली होती पण सद्या केंद्रसरकार काँग्रेस आणि गांधी घराणे यांना सूड बुद्धीची वागणूक देत आहे सत्तेच्या जोरावर भा ज पा चे केंद्रसरकार इ. डी. सारख्या यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचे प्रयत्न करत आहे.

भ्रष्ठाचाराचे आरोप झालेल्या इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश करताच क्लीनचिट देण्याचा सपाटा लावला आहे सर्व सरकारी यंत्रणाचा केंद्रसरकार सातत्याने दुरुउपयोग करत आहे देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, पेट्रोल, डिझल चे वाढते दर जीवनआवश्यक वस्तूवर G.S. T. चा कर लावून जनतेची आर्थिक पिळवणूक करत आहे केंद्रसरकार दोनीही पद्धतीने बहुमताच्या जोरावर जरी काम करत असले तरी येणाऱ्या निवडणूकीत जनता भाजपा प्रणित केंद्रसरकारला धूळ चारल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास डॉ. मोईज शेख यांनी केला.
या वेळी म्हसळा तहसीलदार मा. समीर घारे साहेब यांना निवेदन म्हसळा काँग्रेस कमेटीच्या वतीने देण्यात आले या प्रसंगी म्हसळा तालुका काँग्रेस कमेटीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते. नगर सेवक सुफियान हळदे, बाबाजानं पठाण, जहूर हुरजूक, द्वारकानाथ पाटील, नौशाद टोकनं सलीम धनसे, श्री म्हात्रे, मन्सूर धनसे मिनाज काझी, इम्रान मुंगये, शिवसेनेचे नेते श्री नंदू शिर्के, श्री सुरेश कुडेकर पदाधिकारी, कार्यकर्ते, काँग्रेस महिला कार्यकर्ते नाझीमा मुकादम, यास्मीन मुंगये व सर्व तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या