लोकप्रिय शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांचा बरबडा येथे युवा नेते मंगेश दादा आइनवाड मित्र मंडळाच्या वतीने सत्कार !

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी – आनंद सुर्यवंशी ]
नायगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांचा बरबडा तालुका नायगाव येथे युवा नेते मंगेश दादा आईनवाड यांच्या निवासस्थानी छोटे खानी कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.
नायगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांसाठी नेहमी प्रयत्नशील असणाऱ्या नेत्यांमध्ये कवळे गुरुजी यांचे नाव आहे. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की कवळे गुरुजी सारखा लोकनेता नायगाव विधानसभा मतदार संघात आहे,जिल्ह्याच्या राजकारणात कवळे गुरुजी यांच्या शिवाय कोणीही युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही.
यासाठी मंगेश तुमच्या सोबत राहील ,त्यासाठी कवळे गुरुजी यांनी बरबडा सर्कल युवकांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न करावे आम्ही सर्व बरबडावासी तुमच्या हाकेला ओ देऊ, नेहमी आम्ही चांगल्या व्यक्तीच्या पाठीशी राहत आलो आहोत आत्ता आम्ही कवळे गुरुजी सारख्या नेत्याच्या पाठीशी नेहमी राहू असा विश्र्वास मंगेश आईनवाड यांनी दिला.
यावेळी सिंधीचे सरपंच प्रभाकर पाटील पुयड,ढोल उमरीचे चेअरमन गणेशराव पाटील सरसे, बरबड्याचे माजी उपसरपंच लक्ष्मणराव शिंगेवाड, गंगाधर शिंगेवाड, सोनू खंदारे, सुकेश पचलिंग, गजानन कडपे, शादुल शेख, बाबू शेख, अनिल जंगीलवाड, बाबू शिंगे वाड, बालाजी पुरम वाड, मौला शेख, खैरोदिन शेख, बाबू भुसलवाड, बालाजी जकीलवाड, पत्रकार चंद्रकांत सूर्यतळ, रमेश कोंपलवाड, माधव पुरमवाड, बाबू गजेवाड, यांच्यासह मंगेश दादा आईनवाड मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या