मोटरगा सोसायटीच्या चेअरमनपदी रमेश पा.भिसे तर व्हाईस चेअरमन पदी माधवराव पोताने यांची निवड !

[ प्रतिनिधी – इंद्रजीत डुमणे ]
मुखेड तालुक्यातील मौजे मोटरगा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुक नुकतीच पार पडली आहे. बहुचर्चित असेलेल्या मोटरगा सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक गावातील सत्ताधारी भाजपा व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत प्रतीष्ठेची झाली होती. निवडणुकीच्या सुरूवातीच्या रणधुमाळीत हि लढत अती-तटतीची होईल असे मत राजकीय विश्लेषकांनी वर्तवली होते मात्र गावातील मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी एकतर्फी विजयी करत तब्बल १३ पैकी १३ सदस्यांना विजयी केले आहेत.
गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत या गटाचा अल्प मतांनी निसटता पराभव झाला होता मात्र सेवा सोसायटीच्या निवडणुकीत मोठ्या चालाखीने राजनिती आखुन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झालेल्या निसटत्या पराभवाचा वचपा काढुण प्रतिस्पर्धी गटाला भोपळा ही फोडु न देता धुव्वा उडवित्याची तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा चालू आहे.
सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी झालेले नवनिर्वाचित सदस्य पुढीलप्रमाणे रमेश पा. भिसे, माधवराव आईलवाड, विठ्ठत पा. दारकु, देविदास पा. भिसे, हाणंमतराव दरेगावे, माधवराव पोताने, मारोती भिसे प्रकाश नाईक, पंढरीनाथ वरवटे, हणमंतराव जोंधळे, उत्तमराव विरूपाक्ष, कलावतीबाई शेवाळे, पार्वतीबाई हराळे हे विजयी झाले आहेत.
शेतकरी विकास पॅनेलच्या विजयाबद्दल जेष्ठ नेते मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर. हणमंतराव माजी. आ. पा. बेटमोगरेकर, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप पा.बेटमोगरेकरमा आ.अविनाश घाटे, काँग्रेस कमीटीचे तालुका अध्यक्ष पा.मंडलापुरकर, शहराध्यक्ष नंदकुमार मडगुलवार, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा सौ.अनिताताई राजुरकर, उत्तम अण्णा चौधरी, जि.प सदस्य
प्रतिनिधी संतोष बोनलेवाड युवक काँग्रेसचे डॉ रणजित काळे, माजी जि.प सदस्य जिवन दरेगावे बालाजी पा. भिसे, शिवराज दरेगावे, बापुराव पा. भिसे, हणमंतराव हराळे मधुकर पा भिसे, यशवंतराव जोंधळे रघुनाथ जोंधळे, धम्मानंद जोंधळे आंगद पा.मिसे, प्रविण पा. भिसे, उमेश पा. मिसे माधव पा मिसे, पदमाकर शेकापुरे, हाणंमत भाऊसाहेब भिसाडे शिवराज पा. भिसे, दिलीप हाणमंतराव जोंधळे, यांच्या सह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

*वाचत रहा मास महाराष्ट्र न्युज* www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या