शुद्ध आचरणातून निर्मळ मन व पवित्र वाणीने प्रेमभावे नामस्मरण हेच परमेश्वर प्राप्तीचे सुलभ उपाय – शि.भ.प.युवा प्रबोधनकार राहुल पाटील ममदापूरकर यांचे प्रतिपादन.

[ प्रतिनिधी – गोविंद बिरकुरे ]
दर्यापूर ता.बिलोली येथील चालू असलेल्या चौथ्या अखंड शिवनाम सप्ताहातील चौथ्या दिवसाची परमरहस्य पारायण सोहळ्यातील शि.भ.प.युवा प्रबोधनकार राहुल पा ममदापूरकर यांची प्रवचनसेवा संपन्न झाली.

 या प्रसंगी राहुल पाटील यांनी आपल्या प्रवचनसेवेतून सुंदर उदबोधन करताना म्हणाले कि आपण या मानवी जन्माला आलो हे आपल भाग्य आहे. हा जन्म आम्हाला सहजासहजी मिळाला नसून पूर्वपूण्याइने मिळाला असुन अनेक जन्मफेय्रा फिरुन मनुष्य जन्म मिळाला. या जीवाचे सार्थक करायचे असल्यास शुद्ध आचरणातून निर्मळ मन व पवित्र वाणीने भगवंताचे नामस्मरण केले तरच जीवनात परमेश्वराची प्राप्ती होते.
 १६ व्या शतकात लोप पावत चाललेल्या शिवभक्तीला जाग्रत करत संतशिरोमणी मन्मथ माऊलींनी जीवनात त्याग करून विविध साहित्यातून वीरशैव लिंगायत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. “परमरहस्य ग्रंथ ग्रंथराज थोर शिवयोग विचार सांगितला” वीरशैव धर्माचरण परमरहस्यातुन शिकविले. आणि हेच दिव्य परमरहस्य आम्ही फक्त सप्ताहापुरतेच न वापरता जीवनामध्ये मन्मथ माऊलींनी दिलेल्या परमरहस्याप्रमाणे आचरण केले. तर खरोखरच जीवनाचे सर्वस्वी कल्याण होऊन जीवन सुखकर होईल.
राष्ट्रसंत गुरुमाऊली डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी १०४ वर्षे मानवी जीवाच्या कल्याणासाठी खर्ची घातले. व गुरुवर्य सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य गडगेकर महाराज यांनीही शिवभक्ती चा मळा फुलवित शेवटच्या श्वासात आपल्या प्रवचनात अनन्यसाधारण भक्तीच्या बळावर जेंव्हा जीव जातो तेंव्हा शिव भेटतो असा अनमोल संदेश देत देह सोडला. पण आजही ते देहरुपाने नसले तरी आपल्यासोबत गुरुमाऊलींचा दिव्य आशिर्वाद सदैव तेवत आहे.
शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहरराव धोंडे सर हे देखील वीरशैवलिंगायतांच्या न्यायहक्कासाठी अहोरात्र झगडत समाजहिताचे शेकडो यशश्वी कार्य केले आहे याचीही आम्हाला सदैव जाण असायला पाहिजे. असे अभ्यासू धाडसी नेतृत्व आम्हाला लाभले हे आमचे भाग्य आहे. असे स्पष्टपणे सांगत या सप्ताहामध्ये आपल्या लहान मुलाबाळांना घेऊन यावे कारण या भक्तीकेंद्रातूनच संस्काराचे धडे मिळतात. असा अनमोल संदेशही प्रवचनातून राहुल पाटील यांनी दिला.
यावेळी शिवकीर्तनकार भिम महाराज पटने, गायक राजेश्वर स्वामी कुंडलवाडीकर, सौ.शोभाताई बालाजी भोसकर, निळकंठ पा आरळीकर, लक्ष्मण चिंचाळकर, मल्लिकार्जुन खंडगावकर, संभाजी पाटील पैलवान ममदापूरकर, व गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला पुरुष लहानथोर सदभक्त पंचक्रोशीतील भक्तमंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या