खा.हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उमरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन !

( जिल्हाप्रतिनिधी नांदेड -आनंद सुर्यवंशी )

● ● उमरी

राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेवून शिवसेनेचे पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्वजी ठाकरे यांच्या आवहानानूसार तसेच हिगोलीचे खा.हेमंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उमरी येथे शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुभाषराव पेरेवार, यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

सोमवारी दि.२१ डिसेंबर रोजी उमरी येथिल मोंढा मैदानावर सकाळी ११ वाजता उमरी तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर घेण्यात येणार असून रक्तदान करु ईच्छीनाऱ्या रक्तदात्यांनी राजेश जाधव यांचेकडे नाव नोदनी करावी.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन खा.हेमंत पाटील, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी, माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग देशमुख गोरठेकर, तालुकाप्रमुख सुभाषराव पेरेवार,तहसिलदार माधवराव बोथीकर, गटविकास अधिकारी नारवटकर, मुख्याधिकारी शंकर नरावाड, पोलिस निरीक्षक दत्तात्रेय निकम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शंकर चव्हाण, डॉ. आशिष कदम, डॉ.मारोतराव चंदापुरे, यांची प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

उमरी शहर व तालुक्यातील शिवसैनिकांनी व रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविण्याचे आवाहन तालुकाप्रमुख सुभाषराव पेरेवार यांनी केले आहे.

ताज्या बातम्या