खा.हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद.
उमरी – येथील राजे शिवाजी पूतळ्याच्या नियोजीत स्मारकाठीकाणी शिवसेना तालूका शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला
उमरी येथील मोंढा मैदानावर माजी नगराध्यक्ष तथा तालूका प्रमुख सुभाषराव पेरेवार यांच्या नियोजनाखाली नांदेड, हींगोलीचे शिवसेना तरूण नेतृत्व खा.हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमीत्त ६५ जणांनी रक्तदान केले तसेच गरजू गोरगरीबांना एकावन्न लाभार्थी शोधून अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी युवा उद्ध्योजक ,व्ही.पी.के.समूहाचे संस्थापक मारोतराव कवळे गुरुजी,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पांडूरंग देशमुख,छावाचे राजेश जाधव,भोकर पंचायत समिती सदस्य सुभाष कोळगावकर,पारसमल दर्डा,आनिल दर्डा,सुभाष खांडरे आदी मान्यवरांच्या हस्ते अन्नधान्य कीट वाटप करण्यात आले.
रक्तदानाचे महत्व शासकीय रक्तपेढीच्या डाँ.शितल गजले यांनी अतिशय सोप्या भाषेत समजाऊन सांगीतले तर राजेश जाधव,पांडूरंग देशमुख गोरठेकर,पारसमल दर्डा,उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली.
रक्तदान एकावन्न जणांचे नियोजित असतांना उस्फूर्त प्रतीसादामूळे सत्तरीच्या आसपास रक्तदाते वाढले याकामी शासकीय रक्तपेढीचे नागरगोजे सर,बाबूराव गायकवाड,पाठक,हमीद चाचा व श्री हूजूर साहीब रक्तपेढीचे प्रविण चव्हाण,ओम ठाकूर,सचिन थोरात,महानंदा हळदेकर,पल्लवी सरोदे आदींनी परिश्रम घेतले तर बाबूराव भूत्ते,शिवाजी शिंदे,अशोक जोगदंड,रमेश होनशेट्टे,बळी उमरीकर,गोपाल लोध,विशाल आचकूलवार,मामडे,संजय हंबर्डे,अशोक लोध,सोमू आहीरे,विजय चव्हाण,सुनिल हामंद,साई खांडरे,कृष्णा खांडरे,साईनाथ आरगूलवार,विनोद वर्मा,योगेश शर्मा,संतोष गंगासागरे,माधव सोळंके,रमेश ढगे,बालाजी शिंदे ढोल उमरीकर साईप्रसाद पेरेवार,आदी शिवसैनिकानी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक राजेश जाधव यांनी केले तर सुत्रसंचलन शिवाजी शिंदे यांनी केले.