वडिलांनी दिलेले आश्वासन मी पाच वर्षात पूर्ण करणार – खा. रवींद्र पाटील चव्हाण

[ नायगाव बा. ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
आर्य वैश्य समाज बांधव आमच्या पाठीशी सदैव आहेत हे मी कधीही विसरू शकत नाही वडिलांनी दिलेले आश्वासन पाच वर्षांत पूर्ण करणार तसेच आर्य वैश्य समाजाची कुलस्वामिनी वासवी मातेच्या मंदिरासाठी जागा देण्यात येईल असे मत खासदार रवींद्र पा चव्हाण यांनी आपले मत व्यक्त केल.
जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र पाटील चव्हाण हे खासदार झाल्यानंतर समाजाच्या वतीने भव्य सन्मान करण्यात यावा या उद्देशाने रवींद्र पाटील चव्हाण यांच्या सह प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड जिल्ह्याचे उद्योगपती श्रीराम सावकार मेडेवार तर प्रमुख पाहुणे म्हणून.माधवरावजी आप्पा बेळगे, हनमंतराव पा चव्हाण , नगरपंचायत उपनगराध्यक्ष विजय पा चव्हाण व नगरसेवक पंकज पा चव्हाण, नगरसेविका सौ.आर्चनाताई संजय पाटील चव्हाण व सोनियाताई रविंद्र पा चव्हाण हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आर्य समाज बांधवांची कुलस्वामिनी वासवी मातेची पुजा आरती करण्यात आली भव्य सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी नायगाव तालुक्याचे आर्य वैश्य समाजाचे आध्यक्ष सतीश मेडेवार ,चंद्रकांत सा कवटीकवार, उपाध्यक्ष गजानन चौधरी,सचिव कपिलेश्वर नलबलवार सर सतीश दत्तात्रय लोकमनवार,विनोद सा.गंदेवार, ओमप्रकाश नारलावार, गणेश सा.कोडावार,रमेश सा. चिद्रावार,रमेश मेडेवार,श्रीनिवास गडपल्लेवार,मनोजआरगुलवार, साईनाथ मेडेवार, अतुल कवटीकवार, बालाजी मेडेवार, धनजंय कवटीकवार, जगदीश प्रतापवार, पप्पु गादेवार, पवनकुमार गादेवार, प्रदीप देमेवार , सामाजिक कार्यकर्ते मारोती कत्तुरवार, व समाज बाधंव यांनी कठोर परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी केले व नायगाव शहरातील आर्य वैश्य बाधंव व महिला पुरुष मुला मुली संपूर्ण परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या