रेल्वेच्या विविध प्रश्न संदर्भात रेल्वेमंत्री यांची खा रवींद्र चव्हाण यांनी घेतली भेट.

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नांदेड जिल्ह्यासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले मराठवाड्यातील रेल्वे प्रश्न लवकरच मार्गी लावणार असून प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन ‘वंदे भारत’ एक्सप्रेस नांदेडपर्यंत चालविण्याबाबत रेल्वे मंत्रालय विचाराधीन तर आहेच शिवाय निजामाबाद-तिरुपती रॉयलसीमा एक्सप्रेस सुद्धा नांदेड येथूनच चालविण्याचाही विचार केला जाईल,अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नांदेडचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांना दिली.
       मराठवाड्यातील विशेषतः नांदेडच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या रेल्वे विषयक प्रश्नी खा.रवींद्र चव्हाण यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. व्यापारी आणि प्रवाशांच्या सोयीची असलेली वंदे भारत एक्सप्रेस नांदेडपर्यंत आणावी, तिरुपती देवस्थानला जाणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी निजामाबाद-तिरुपती रॉयलसीमा एक्सप्रेस नांदेडहून सुरु करावी ही गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी प्रलंबित आहे. नांदेड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेसला दादर स्थानकावर थांबा द्यावा, आदी मागण्यांचे निवेदन खा.रवींद्र चव्हाण यांनी सादर केले. 
       या सर्व मागण्या त्वरित मान्य करून प्रलंबित रेल्वेविषयक प्रश्न मार्गी लावावेत, अशी विनंती त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली. रेल्वेमंत्र्यांनी या मागण्यांची दखल घेऊन सर्व प्रश्न सोडविण्याबाबत रेल्वेमंत्रालय लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन खा.रवींद्र चव्हाण यांना यावेळी दिले. खा.रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभेत शेतकर्‍यांच्याप्रश्नावर आवाज उठविला होता.नांदेड जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या प्रश्नावर केंद्र सरकारचे लक्ष्य वेधण्याचा आणि सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांचा अटोकाट प्रयत्न सुरु आहे.
www.massmaharashtra.com 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या