बिलोली म.रा.प.चे बस चालक लक्ष्मण विर यांच्या सेवापुर्ती दिनी गौरवपुर्वक सत्कार 

 बिलोली आगारातील बस चालक लक्ष्मण विर यांच्या सेवाकार्यात २५ वर्षात कोणताच अपघात झाला नसल्याने आगार प्रमुख सुभाष पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार ..! 

(बिलोली ता.प्र. सुनिल जेठे )
बिलोली म.रा.प.आगाराचे बस चालक लक्ष्मण विठ्ठल विर यांनी गेल्या २५ वर्षे विना अपघात उत्कृष्ट एस.टी.चालक म्हणून सेवा बजावत लक्ष्मण विर यांची सेवापूर्ती व सेवानिवृत्त झाली. या निमित्त निरोप समारोह कार्यक्रम दि ३० जुन रोजी स्वागत सत्कार आगार प्रमुख सुभाष पवार यांनी आपल्या हस्ते रोख रक्कम व सन्मान चिंन्ह लक्ष्मण विर यांना देऊन सत्कार केला.

सदरिल लक्ष्मण विर बस चालक यांनी २५ वर्षाच्या या सेवेत सुपर एक्सप्रेस ते लोकल बस चालाविली. या दरम्यान वाहक व प्रवासी महिला व नागरिकांशी मनमिळावू , स्वभाव आशी वागणूक देत कुणालाही कुठलाही ञास व अपघात होणार नाही याची खबदारी घेऊन बस चालविली. म्हणून बिलोली तालुक्यात नागरिकांच्या व रा.प मं. च्या कर्मचारी यांच्या मनावर विर हे नाव कोरले असल्याचे या सेवापूर्ती कार्यक्रमात अनेक मान्यवर आपल्या भाषणात म्हणाले आणि पुढिल आयुष्य सुख समृद्धी, आरोग्य दायी आनंदमय जावो अशी सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी आगार प्र. सुभाष पवार, आगार लैखाकार, बी.जी.पेटे, बि.टी सर्जे, सेवा नि. शिक्षक एस.एन कांबळे, पञकार राजेंद्र कांबळे, सेवानिवृत्त मेकानिक डि.पी.गाडेकर, विजय कोलंबरे, साई खंडेराय, संजय भेदे, एस.जी.भुसावळे, के.एन. पांचाळ, जी.जी.भालेराव, मुकिंदर कुडके, संजय जाधव, पञकार सुनिल जेठे, शिवाजी गायकवाड, बाळासाहेब लाखे, शिलानंद बुध्देवार, कटारे यांच्या सह अदी आगारातील कर्मचारी उपस्थित होते.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या