मुदखेड ग्रामीण रुग्णालय येथे दिव्यांग लोकांसाठी कोविड लसीकरण !!

 शहरातील ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डाॅ.दिलीप फुगारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील व शहरातील दिव्यांग लोकांसाठी कोविड लसीकरण राबविण्यात आले, आता पर्यंत पंधरा दीव्यांग नागरिकांनी लस घेतली व इतर सर्व दीव्यांग नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन,ग्रामीण रुग्णालय मुदखेड वैद्यकीय अधीक्षक डॉ दिलीप फुगारे सर यांनी केले.
या वेळी डॉ.कपिल जाधव, डॉ विशाल नागशेट्टीवार, डॉ.आशिष तळणीकर, डॉ उमनवार, अशोक मामीडवार, प्रदीप कांबळे, गजानन गोरे, अनिता कदम, छाया सोनटक्के सिस्टर व सर्व कर्मचारी उपस्थित होते तसेच मा. नगरसेवक कैलाश गोडसे व इतर प्रतीष्ठीत नागरिक हजर होते.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या