मुंबई वांद्रे वरळी सी लिंकवर भीषण अपघातात पाच ठार व आठ जखमी.

[मुंबई प्रतिनिधी: महेश कदम]
मुंबई वांद्रे वरळी सी लिंकवर बुधवारी पहाटे पावणेतीन च्या सुमारास भीषण अपघात झाला या अपघातात पाच जण जागीच ठार झाले तर आठ जण जखमी झालेत, या भीषण अपघातात चार गाड्यांचा सुद्धा चुराडा झाला आहे, पोलिसांनी कार चालक ईरफान अब्दुल रहीम याला अटक केली असून पुढील तपास चालु आहे.
बुधवारी पहाटे दसरा सणाच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली, वरळी सी लिंकवर एका कारचा टायर फुटल्याने मदतीसाठी सुरक्षा सुपरवायझर चेतन कदम सह अन्य सहकारी हेमंत चव्हाण, गजराज सिंग, सत्येंद्र सिंग, राजेंद्र सिंघल, सोमनाथ साळवे हे रुग्णवाहिका वँन बरोबर पोहचले, मदत कार्य सुरु असताना अन्य गाड्या सुद्धा थांबले होते, मागून येणारी भरधाव कार ने जोरात धडक देऊन निष्पाप लोकांना चिरडले, या अपघातात तेरा जणांना जवळच्या नायर रुग्णालयात दाखल केले असून, पाच कामगारांना डाॅकटराने मृत घोषित केले तर अन्य जनांवर उपचार सुरु आहेत.

 

मुंबई वांद्रे वरळी सी लिंकवर भीषण अपघातात पाच ठार व आठ जखमी.
मुंबई वांद्रे वरळी सी लिंकवर भीषण अपघातात पाच ठार व आठ जखमी.
मुंबई प्रभादेवी हिथे एका सामान्य घरातील चेतन कदम आपल्या वृद्ध विधवा आई सह, बायको, एक लहान मुलगा व भाऊ बरोबर रहात होता, चेतन कदम हे राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष पदाधिकारी होते, तसेच अनेक लोकांच्या मदतीला ते धावायचे. कोविड काळात अनेक मदत कार्य त्यांने केले होते, या अधी सी लिंकवर आत्महत्या करणारे लोकांचा जीव सुद्धा चेतन कदम ह्यांने वाचवले होते.

त्या करीता त्याला पुरस्कार ही प्रधान झाले होते, बांद्रा पोलीस स्टेशन कडून व मेप मॅनेजमेंट करूनही चेतन कदम यांचे सत्कार झाले होते. सोमनाथ साळवे ह्यांना तीन लहान मुले असुन नुकताच नोकरी ला लागले होते व अन्य तीन कर्मचारी हे राजस्थान चे रहिवासी होते. अपघाताची बातमी समजतात असंख्य मित्र नातेवाईक नायर रुग्णालयात दाखल झाले होते.

उदरनिर्वाह करुन घरात एकटेच कमावणारे हे कर्मचारी होते. प्राणज्योत मावळयाने असंख्य मित्र परिवार कै.चेतन कदम यांच्या अंतीम दर्शनास आले होते. तसेच भारताचे पंतप्रधान माननीय. श्री. नरेंद्र मोदी सह मुंबई चे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे सुप्रिया सुळे, जयवंत पाटील यांनी सुद्धा दुखद भावना व्यक्त केली आहे. या कुटुंबांना कंपनीकडून तसेच राजकीय व शासकीय मदत लवकरात लवकर जाहीर व्हावी अशी भावना मित्र व नातेवाईकांनी यांनी व्यक्त केली आहे.
चेतन कदम हा रोडवेज सोलुशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड या कंपनीच्या कर्मचारी होता. सिक्युरिटी सुपरवायझर म्हणून त्याला नाईट ड्युटी वर तैनात करण्यात आले होते. परंतु आश्चर्याची बाब अशी आहे ह्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही नियुक्त पत्र दिलेले नाही. तसेच कोणत्याही प्रकारची ट्रेनिंग आणि सेफ्टी यंत्रणा दिले नव्हते.
आशिया खंडातील नावाजलेला सी-लिंक त्या ठिकाणी अपघात घडल्यावर ही कोणताही ट्रॅफिक पोलीस किंवा वरिष्ठ अधिकारी हजर नव्हता. सी लिंकवर वारंवार अपघात घडत असुन गाड्या वेगाने धावत असतात तरी पोलीस कधीच तैनात नसतात, ह्या सगळ्या गोष्टीचा चेतन कदम च्या नाते वाईकांनी खेद व्यक्त करून चेतन कदम यांच्या मृत्यूला कंपनीचे संचालक आणि वरिष्ठ अधिकारी हेच जबाबदार आहेत असा गंभीर आरोप केला आहे व वाहन चालकास कठोर कारवाई झाली पाहिजे असे देखील व्यक्त केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या