जेष्ठ नागरिकांसाठी वृद्ध नागरिक कक्षाचे उदघाटन ; नगरपालिकेचा अनोखा उपक्रम !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील शहरातील 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शहरात विरंगुळा किंवा एकत्र बसून गप्पा मारण्याची बैठक व्यवस्था नसल्यामुळे जेष्ठ नागरिक हे मुख्यबाजार पेठेतील जमेल त्या ठिकाणी बसून गप्पा मारत होते, अशा जेष्ठ नागरिक व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी नगरपालिका प्रशासनाने दिनांक 27 रोजी ‘थोडेसे मायबापासाठी पण’ या उपक्रम अंतर्गत मुख्यबाजार पेठेतील के रामलू शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये ‘वृद्ध नागरिक कक्षाचे उदघाटन केले आहे.
या कक्षामध्ये जेष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, वाचन करण्यासाठी वर्तमानपत्र, विरंगुळा व मनोरंजनासाठी टि.व्ही.ची व्यवस्था करण्यात येणार आहे.
असा अनोखा उपक्रम नगरपालिका प्रशासनाने राबविल्याबद्दल जेष्ठ नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. यावेळी वृद्ध नागरिक कक्षाचे उदघाटन नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार यांच्या हस्ते करुन जेष्ठ नागरिक गंगाधर जायेवार, गंगाधर पेंटावार, मोहनाजी कोटलावार, नागनाथ जायेवार, लक्ष्मण गांजरे, गोदावरी पेंटावार, आदींचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे नगराध्यक्ष प्रतिनिधी नरेंद्र जिठ्ठावार, अंजूताई दाचावार, नगरपालिका कर्मचारी अधिक्षक सुभाष निरावार, मुंजाजी रेणगडे, गंगाधर पत्की, शंकर जायेवार, मारोती करपे, मोहन कंपाळे, धोंडीबा वाघमारे, शुभम ढिलोड, निर्मला वाघमारे आदी उपस्थित होते..
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या