चिरलीच्या शिवारात युवकाचा खून ; पाच आरोपी फरार – कुंडलवाडी पोलीसांकडुन आरोपींचा शोध सुरू

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथून 6 किमी अंतरावर असलेल्या मौजे चिरली येथील बाळासाहेब चव्हाण यांच्या शिवारात दिनांक 26 ऑक्टोबर रोजी रात्री 10 च्या सुमारास मन्मथ इरवंता धोंडापूरे यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला आहे,यातील फरार झालेल्या सर्वआरोपींचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहरापासून 6 किमी अंतरावर असलेल्या मौजे चिरली येथील आरोपी बालाजी शिवाजी ढगे यांनी दोन तीन दिवसापासून मनमंथ इरवंत धोंडापुरे वय 28 वर्ष रा चिरली यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.
त्यांनी व त्यांचे मित्र बंटी ढगे, कृष्णा ढगे, गोविंद ढगे, सचिन खंडगाळे, यांना सोबत घेऊन दिनांक 26 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास मनमंथ धोंडापुरे यांच्यासोबत भांडण करून त्यांच्या शरीरावर व डोक्यावर कोणत्या तरी धारदार शास्त्राने वार करून त्याला जीवे ठार मारले व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने बाळासाहेब चव्हाण यांच्या शेतामध्ये फेकून दिले.अशी फिर्याद मयताचे वडील इरवंत धोंडीबा धोंडापुरे रा.चिरली यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी बालाजी ढगे, बंटी ढगे, कृष्णा ढगे, गोविंद ढगे,सचिन खंडगाळे, सर्व राहणार चिरली ता बिलोली यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन कुंडलवाडी येथे गुन्हा रजिस्टर नंबर 119 /2022 कलम 302, 201, 143, 147, 148, 109, भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले,पोलीस उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी,पोहकाँ शेषेराव कदम,अलमोद्दीन शेख,पो.हा.महेश माकुलवार,ईद्रिस बेग,रघुवीर चौव्हाण, सुदर्शन कमलाकर आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
पुढील तपास धर्माबादचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत कासले हे करीत आहेत.सदरील आरोपी फरार असले तरी तात्काळ आरोपींना अटक करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या