बजरंग दल कार्यकर्त्यांची हत्या करणाऱ्या आतंकवादी मानसिकतेच्या नराधमांना फाशी द्या – लोहा विहींपची मागणी !

[ विशेष प्रतिनिधि / रियाज पठान ]
कर्नाटक राज्यातील शिमोगा येथे हर्ष नामक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सदर घटना अतिशय निंदनीय व निषेर्धाह आहे. सदरील हत्या जिहादी मानसिकतेने पछाडलेल्या समाजकंटकांकडून करण्यात आली असून दोषिविरुद्ध कठोर कार्यवाही करून त्यांना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी.
अशी मागणी लोहा विहीपच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. विश्व हिंदू परिषद लोहा शाखेच्या वतीने लोहा तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पापुलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांनी समाज मनांमध्ये जे विष पसरविणे सुरू केले आहे त्याचा परिणाम म्हणजे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या आहे.
भारतात घडलेल्या १९४६ च्या डायरेक्ट अँक्शन चळवळीशी साधर्म्य असलेल्या या सर्व मानसिकतेवर कायद्याने कठोर कार्यवाही करावी व संबंधित आरोपींना जरब बसावी अशी शिक्षा व्हावी. तसेच सिमीचेच दुसरे रूप असलेल्या पापुलर फ्रंट ऑफ इंडिया, कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया व सोशल डेमॉक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांवर व त्यांच्या नेतृत्वावर बंदी घालून त्यांना पायबंद करावा अन्यथा हिंदू समाज व हिंद नेतृत्व त्यांना वठणीवर आणण्यासाठी सक्षम आहे. कायदा कायद्याचे काम करेलच परंतु त्यांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेतृत्वाने याचा गांभिर्याने विचार करून सुधारावे. सिमीचेच दुसरे रूप असलेल्या उपरोक्त संघटनांचे पाळेमुळे महाराष्ट्रातही खोलवर रूजलेले आहेत.
त्यावर बंदी घालून योग्य प्रतिबंध करावा अन्यथा विश्व हिंदू परिषद कायदेशीर ब संवैधानिक मार्गाने उत्तर देईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर विहीपचे तालुकाध्यक्ष युवराज पाटील शिंदे, शहराध्यक्ष अंबादास पाटील पवार, कृष्णा वानखेडे, दिलीप इंदुरकर, सुरजसिंह बयास, सखाराम तोंडचिरे, कुलदीपसिंह चौहान, पांडुरंग सोळंके, नारायण कदम, धनंजय शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या