मुरुड जंजिरा नगरपरिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना शुभारंभ !

(रायगड /म्हसळा प्रतिनिधी- प्रा.अंगद कांबळे)
मुरुड जंजिरा नगर परिषद च्या वतीने प्रधानमंत्री आवास योजेने च्या माध्यमातून सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देण्यांत येणार आहेत.

या मध्ये 18 वर्षा वरील विवाहित अविवाहित लाभ धारक आपले अर्ज करू शकतो. तो पूर्वी कोणत्या हि घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा असे गरजू नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या कार्यकर्माला नगरपरिषद मुख्याधिकारी अमित पंडित, नगर अध्यक्षा श्रीमती स्नेहा पाटील, नगरसेवक, कर्मचारी तसेच श्री. दत्तात्रय चौगले समन्वयविकास अधिकारी नवनिर्माण बहुउदेशीय संस्था यांनी प्रधानमंत्री योजनेची माहिती सांगितली.
तसेच यावेळी प्रकल्प समन्वयक श्री संभाजी शिंदे हे हि उपस्थित होते. नगरअध्यक्षांनी जास्तीजास्त नागरिकीनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या साठी समन्वयक  श्री संभाजी शिंदे नगरपरिषद यांच्याशी संपर्क साधावा ( 9518712929) असे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या