लोह्यात मुस्लिम आरक्षणा संदर्भात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन !

(विशेष प्रतिनिधी / रियाज पठान)
लोहा येथे मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मुस्लिम आरक्षण या सह विविध मागण्यांचे निवेदन आज १८रोजी शुक्रवारी लोहा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.
महाराष्ट्रातील मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात मागासलेला आहे.याबाबत सविस्तर आणि अतिशय अभ्यासपूर्ण असा डॉ.महेमूद उर रहमान अभ्यास गटाचा अहवाल सरकारकडे आहे.
त्यांनी त्यामध्ये मुस्लिमांना राज्याच्या शासकीय सेवेत व शैक्षणिक संस्थेत आठ टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती.यासह इतर महत्त्वाच्या शिफारशी केल्या होत्या.मात्र आजपर्यंत मुस्लिमांना आरक्षण मिळाले नाही.डॉ.महेमूद उर रहेमान अभ्यास गटाच्या ज्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठीच्या व्यापक शिफारशी होत्या त्यावर देखील काही निर्णय घेण्यात आला नाही.
आजची मुस्लिम समाजाची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर अत्यंत मागासलेला समाज असल्याचे दिसून येते म्हणून आम्ही मुस्लिम बांधव आपल्याला या संदर्भात शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे.इतर मागण्यांवर देखील निर्णय घ्यावा असे निवेदनामध्ये म्हटले आहे.
मुस्लिमांना डॉक्टर महमूदपुर रहमान अभ्यास गटाच्या शिफारशीप्रमाणे आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात यावा.मॉबलिंचींग केलेल्या मोहसीन शेख ला न्याय देण्यात यावा माॅब लिंचिंग विरुद्ध कायदा तयार करावा.
प्रत्येक जिल्ह्यात मुस्लिम मुला-मुलींसाठी वस्तीगृह उभारण्यात यावे.बार्टी आणि सारथी च्या धर्तीवर मुस्लिम मुला-मुलींना युपीएससी-एमपीएससी साठी संस्था स्थापन करण्यात याव्यात.
मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ करण्यात यावी.यासह अन्य मागण्यांचे निवेदन लोहा तहसील कार्यालयातील तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी या देण्यात आले.
सदरिल निवेदनावर लोहा नगरपरिषदेचे नगरसेवक प्रतिनिधी शेख नबीसाब,अकबर मौलाना हाफिस मोहसिन बागवान, पत्रकार फेरोज मणियार, शेख इर्शाद चौधरी,पत्रकार शिवराज दाढेल,फेरोज पटेल सर, मोहसिन बागवान शफी सेट बबलू बागवान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ताज्या बातम्या