तळेगांव ता.उमरी येथे एम.व्हि.के.अॕग्रो फुड लि कुसुमनगर वाघलवाडा साखर कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांच्या उपस्थितीत उस लागवड व नियोजन शिबीर संपन्न!

(प्रतिनिधी नांदेड जिल्हा-आनंद सुर्यवंशी)

दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शेतक-यांना रब्बी व खरीप पिकांचे नुकसान होत चालले.कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ त्यामुळे सोयाबीन, मुग, ऊडिद, कापुस,ज्वारी, आधी सह पिके ऐन काढणीच्या वेळी संकटावर संकट शेतक-यावर येत आहे. ज्या शेतक-यांकडे सिंचनाची सोय आहे.कमी पाण्यात ठिंबक व नियोजन बद्द जास्त उत्पन घेयाचे झाले तर ऊस पिंकाकडे शेतक-यांनी वळले पाहिजे. त्यासाठी शेतक-यांनी ऊसाची लागवड कशी केली पाहिजे, त्यांचे नियोजन व उत्पादनात वाढ..आणी विशेष म्हणजे किती ही पाऊस पडला तर ऊस पिकांना काही होणार नाही.

याविषयी तळेगांव येथिल शेतकऱ्यांना एमव्हीके कुसूमनगर वाघलवाडा साखर कारखान्याचे चेअरमन तथा व्हीपीके उद्योग समुहाचे चेअरमन मारोतराव कवळे गुरूजी यांनी शेतक-यांना आपल्या मार्गदर्शन बोलत होते . यावेळी ऊस विकास आधिकारी श्री.पडोळे साहेब यांनी उसाच्या जाती व खत व्यवस्थापन,एकंदरीत १०० ते १५० टनाच आव्हरेज कस येईल यावर त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी,माधवराव पा जाधव,संजयजी कुलकर्णी ,प्रल्हाद पाटील,गणेशराव जाधव,बालाजी पा.पवार,देविदास रजेवाड,बशीर पटेल,सुलेमान,रतन पाटील, रवि पाटील,बशिर बेग,खैसरबेग,लालु रेडी,बालाजी नागलवाड,केशव पा.जाधव,सिकंदर पटेल,मलु नाटकर,देविदास रजेपवाड पा.जाधव,कारखान्याचे जनसर्पक आधिकारी यु.जी.कदम ,एस.जे सावंत व्हि.पी.के उस वि.अधिकारी श्री.शेळके साहेब हे उपस्थितीत राहणार आहेत.तरी तळेगाव येथील असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

ताज्या बातम्या