नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्षांची कुंडलवाडी येथे सांत्वनपर भेट !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथे दिनाक ५ डिसेंबर २०२१ रोजी किरकोळ कारणावरून नरशिमलू गंगाराम अटणलवार यांना मारहाण झाल्याने नांदेड येथे उपचार दरम्यान दि.१२ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले. मयाताच्या घरी नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष मा.संजय मोगडपल्ले,सचिव जयराज शिंदे, कार्याध्यक्ष मोगलाजी लिंगमपल्ले, महानगराध्यक्ष बाळू पवार, बिलोलीचे तालुकाध्यक्ष लिंगुराम पय्यावार आदींनी भेट देऊन मयताच्या कुटुंबांना धीर देवून सात्वन केले. कुटुंबाला मदत करण्यासाठी व अडीअडचनी कधीही सोडवण्यासाठी तयार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या