सावळी सेवा सहकारी सोसायटी वर सलग आठव्यांदा नागनाथराव पाटील सावळीकर विजयी !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
           बिलोली तालुक्याचे लक्ष लागुन राहीलेल्या सेवा सहकारी सोसायटी म.सावळीच्या २०२२-२७ पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बिलोली ता.अध्यक्ष मा.श्री. नागनाथराव पाटील सावळीकर यांच्या कर्तबगार नेतृत्वावर विश्वास ठेवत गावकऱ्यांनी त्यांच्या शेतकरी विकास पॅनलचे १३ पैकी १३ उमेदवारांना भरघोस मतदान देऊन विजयी केले. या संस्थेचे मा.श्री. नागनाथराव पाटील सावळीकर हे मागील ३५ वर्षांपासून सलग ७ वेळेस चेअरमन होते, आता हा त्यांच्या चेअरमन पदाचा आठवा कार्यकाळ असणार आहे. या विजयाबद्दल त्यांचे व त्यांच्या विजयी उमेदवारांचे सर्व पक्षीय ज्येष्ठ नेत्यांकडून व समाजातील सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे नागनाथराव संतुकराव पाटील,ॲड. शंकरराव कुरे, पाटील,आबाराव राजेन्ना संगनोड,शेख जनिमियां अमिनसाब, गंगाधर नागोराव आरसे, बळीराम गंगाराम प्यादेकर, गंगाधर शंकर संगनोड, गंगाधर प्रभन्ना कोषकेवार, शांताबाई गंगाधर बिंगेवार, श्रीमती.प्रयागबाई सायबु लोहेकर, सुरेश माधवराव येसगीकर, रामचंद्र गंगाधर कामनासे, मारोती नरसिंग सुरकुटलावर.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या