मा.नागोराव गुरुजी ( दादा ) पँथर अनंतात विलीन !

[रायगड / म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे]
शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा !…  या डॉ बाबासाहेब आंबेडकरानी दिलेल्या मूलमंत्रा प्रमाणे वागत अतिशय खडतर प्रवास करत, शिक्षणाला महत्वाचे मानून व बाबासाहेबांच्या विचाराने भारावून जाऊन शिक्षणच आपला उद्धार करणार व माणसाला तारणार ही खून गाठ मनामध्ये ठेवून शिक्षण घेऊन शिक्षकी पेशा स्वीकारून बाबासाहेबांचे आचार विचार समाजात रुजवत आणि समाजातील गरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी साठी दादाने फारमोठे योगदान दिलेले आहे.

एक अतिशय प्रेमळ शिक्षक म्हणून दादा उमरगा तालुक्यात व तालुक्या बाहेर परिचित होते. दादांनी आयुष्यभर अनेकांचे आयुष्य घडवण्याचे काम केले दादा आयुष्यभर शिक्षणा पासून कधी दूर गेले नाहीत.
प. पूज्य. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे निधन झाल्या नंतर त्यांच्या पवित्र अस्थी दादांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी आपल्या गावी (सालेगाव ) ता. लोहारा या ठिकाणी आणून प्रेरणादायक स्मृती स्तंभ उभे करून महत्वपूर्ण कार्य दादांच्या हयातीत झाले.
आणि येणाऱ्या पिढ्यांपर्यंत बुद्धाचे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचा आदर्श दादांनी घालून दिला. वयाच्या 90 मध्ये ही दादा लोकांची मायेने विचारपूस करत असत. अश्या थोरविभूतींचे बाबासाहेबाच्या विचाराच्या पाईकांचे वयाच्या 93 वर्षी दुःखद निधन झाले त्यांच्या या जाण्याने समाजात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे समाज दादांचे कार्य आणि शिकवण कधीच विसरू शकणार नाही व दादाच्या कार्याची आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीची मशाल तेवत ठेवण्याचा संकल्प करूया.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या