नागपंचमीच्या दिवशी नागबर्डीमध्ये भरली नागदेवतेची मोठी यात्रा

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी -गजानन चौधरी ]
नायगाव तालुक्या जिल्ह्यातील भाविक दर्शनासाठी कंधार तालुक्यातील गुंडा नागबर्डी येथे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची मोठी यात्रा भरली. निसर्गाचे संवर्धन आणि संगोपनाची परंपरा ही यात्रा चालवत आहे. या यात्रेत हजारो भाविकांनी येऊन नागोबाचे दर्शन घेतलं. नवसाला पावणारा नागोबा, अशी याची ख्याती आहे.
बाहेर देशातून बहीण-भाऊ उदरनिर्वाह करण्यासाठी कंधार तालुक्यातील दिंडा, गुंडा, बिंडा या गावाच्या परिसरात फिरत ते नागबर्डी माळरानावर येऊन एक मालकाची जनावरे चारत होते. यावेळी नागोबाच्या वारुळाला भावाने चार ते पाच खडे मारताच नागराज जागृत होऊन त्या भावाला नागदेवताने दंश केला. त्याठिकाणी असलेल्या लिंबाच्या झाडाच्या पालाचा रस भावाला पाजल्यानंतर तो जिवंत झाला, अशी आख्यायिका सांगितली जाते.
नागराजाची मूर्ती तेव्हापासून आहे. तेव्हापासून लिंबाचे झाड तोडले जात नाही. झाडे तिथेच कुजली तरी शेतकरी झाड तोडत नाहीत. दरवर्षी नागपंचमीला या माळरानावर नागराजाला दूध पाजविले जाते. नागराज केवळ नागपंचमीच्या दिवशीच त्या वारुळात येत असतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या