नागपूर येथे सध्या सुरूअसलेल्या महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन 2024 मध्ये आज नायगाव विधानसभा मतदारसंघातील विविध समस्या शासन दरबारी आ. राजेश पवार यांनी मांडल्या व्यथा.
रबी पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. शेतकरी बांधवांनी नादुरुस्त विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बदलून देण्यासाठी विनंती करुन देखील नांदेड ऊर्जा विभागातील अधिकारी, कर्मचारी तो देण्यास टाळाटाळ व विलंब करत आहेत. परिणामस्वरुप शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिके जळून चालली आहेत. यासाठी शासनाने ऊर्जा विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात. विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) दुरुस्तीची मागणी आल्यास शेतकऱ्यांना 48 तासाच्या आत अर्थात दोन दिवसात दुरुस्त करुन मिळावा.
शेतकऱ्यांनी विनंती करुन देखील ट्रान्स्फॉर्मर देण्यास विलंब झाला व शेतकऱ्यांचे त्यामुळे नुकसान झाले तर होणा-या नुकसानीची भरपाई ऊर्जा विभाग अथवा शासनाने स्वत: द्यावी. कामात दिरंगाई, हलगर्जीपणा करणा-या दोषी अधिकाऱ्यांवर शासनाने कडक कारवाई करावी.
विद्युत यंत्रणेत ब्रेकडाउन (तुटातूट, बिघाड) व प्रिव्हेंटिव्ह (निवारक) अशा दोन महत्त्वाच्या एजन्सीज समाविष्ट आहेत. परंतु प्रत्यक्ष या एजन्सी कुठेही काम न करता केवळ कागदी घोडे नाचवत बोगस बिले उचलत आहेत. ही गंभीर बाब असून याबाबत अशा अधिका-यांची चौकशी करुन कडक कारवाई करावी. ऊर्जा विभागाकडून ट्रान्सफॉर्मर देण्याच्या विलंबास अनेकदा ऑईल शिल्लक नसल्याचे कारण सांगितले जाते. परंतु हे ऑईल चोरी व विक्री करणाऱ्यांचे एक मोठे रॅकेट सक्रीय आहे. अशा दोषींन शोधून त्यावर कारवाई व्हावी.
मतदारसंघातील बरेच विजेचेखांब व तारा या जुन्या झाल्या आहेत. अनेक घरांवरुन या तारा गेलेल्या असल्याने विजेच्या शॉकने व त्या तुटून काही दुर्दैवी मृत्यूही झाले आहेत. आरडीएसएस या योजनेत समावेश करुन अशा सर्व तारांच्या जागी नव्यातारा बसविण्यात याव्यात.
‘मागेल त्याला सोलार पंप’ ही भाजप-महायुती सरकारची शेतकरी हिताची योजना जरी कार्यान्वित असली तरीदेखील 5Hp च्या वरती क्षमतेचे कृषी पंप असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोटारी मात्र सोलारवरती चालत नाहीत. अशा शेतकऱ्यांना लागणारे नियमित विज कनेक्शन (लाईट) त्वरित देण्यात यावे.
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या 2023 चा पिकविमा अद्यापही मिळाला नसल्याने तो वितरित करण्याचे पीक विमा कंपनीस त्वरित आदेश देण्यात यावेत. अशा अनेक महत्त्वाच्या स्थानिक समस्या व प्रशासनाशी संबंधित बाबी सभागृहात आ राजेश पवार यांनी मांडल्या आहेत.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy