नायगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी मीनाताई कल्याण यांचे निवडीचे जल्लोषात स्वागत !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
नायगाव नगर पंचायत च्या नगराध्यक्ष पदावर सौ मिनाताई सुरेश कल्याण यांची सोमवारी बिनविरोध करण्यात आल्याने काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरात फटाकड्याची आतिशबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला.
 या निवडणुकीच्या वेळी सभागृहात निवडणुक तथा उप जिल्हाधिकारी सचिन गिरी, सीईओ नंदकुमार भोसीकर, रामेश्वर बापुले, जाधव सर्व नगर सेवकांची उपस्थिती होती. नायगाव नगर पंचायत सभागृहात एकुण १७ नगर सेवकांची संख्या असून सर्वच नगरसेवक काँग्रेस पक्षाचे असून विरोधकांना खाते ही उघडता आले नसल्याने सभागृहात माजी आ.तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांची एक हाती सत्ता आहे.
तात्कालिन नगराध्यक्षा सौ.गीता जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने नुतन नगर अध्यक्ष पदावर सौ मिनाताई सुरेश पा.कल्याण यांची निवड करण्यात आली.
या निवडीच्या वेळी माजी आ.वसंतराव चव्हाण, माधवराव बेळगे, बळवंतराव बेटमोगरेकर, केशवराव चव्हाण, कैलास गोरठेकर, हानमंतराव चव्हाण, श्रीनिवास चव्हाण,उप नगराध्यक्ष विजय चव्हाण, संजय बेळगे, सुरेश पाटील कल्याण, प्रा.रविंद्र चव्हाण, नगरसेवक दयानंद भालेराव, विजय भालेराव , सौ.सुमनबाई सोनकांबळे, सौ.ललीता भालेराव, पंकज चव्हाण, सुभाष कल्याण, डाॅ शिवाजी कागडे आदीची उपस्थिती होती.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या