नायगावात मानाच्या पालखीच्या गणपतीची भव्य दिव्य मिरवणूक !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव येथील अमृत महोत्सव वर्ष असलेल्या मानाच्या पालखीच्या सार्वजनिक गणपतीचे ढोल ताशाच्या आवाजात टाळ मृदंगाच्या गजरात गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देत मिरवणूक काढण्यात आली.

गणपती बाप्पाची आरती दुपारी दोन वाजता उपनगराध्यक्ष विजय पा. चव्हाण, तंटामुक्तीचे अध्यक्ष हनमंतराव पा चव्हाण, माधव आप्पा बेळगे, केशवराव पा चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी बाबुराव लंगडापुरे, बालाजी बच्चेवार, श्रीनिवास पा चव्हाण, भगवान पा कल्याण, चंद्रकांत सा कवटिकवार संगमनाथ सा कवटिकवार, अशोक सा गंजेवार, दत्तात्रय सा लोकमनवार, गजानन चौधरी, सतीश मेडेवार, महेश पत्तेवार, पांडुरंग पा चव्हाण, प्रल्हाद पा बोमनाळे, प्राचार्य जीवन चव्हाण, सचिव संजय कदम, लक्ष्मण सा मामीडवार, वसंत सा कवटीकवार, गणेश सा पाळेकर, सूर्यकांत कवटिकवार,कैलास कवटीकवार, विश्वनाथ पा कल्याण, शंकर बेलगे, वामनराव शिकारे, गजानन फुलारी, यांच्यासह असंख्य गणेशभक्त , व्यापारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही मिरवणूक मार्केट कमिटी पासून शहराच्या मुख्य रस्त्यावरून जुन्या गावातून निघाले या पालखीच्या गणपतीचे जागोजागी महिला पुरुष भाविकांनी आरती ओवाळून नारळ फोडून स्वागत केले. 

Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या