नायगाव व कुंटुर बाजार समिती च्या शेवटच्या दिवशी नामांकन दाखल करण्यासाठी मोठी गर्दी !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव व कुंटूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व भाजपने शेवटच्या दिवशीच उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सोमवारी मोठी गर्दी झाली होती. यावेळी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नामांकन दाखल झाल्यानंतर आ. राम पाटील रातोळीकर यांच्या उपस्थितीत भाजपच्या वतीने शक्ती प्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. विशेषतः भास्करराव पाटील खतगावकर यांनीही आपल्या समर्थकांचे अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थिती लावली होती. नायगावसाठी ९० तर कुंटूरसाठी ९० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

नायगाव व कुंटूर बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर नायगाव तालुक्यात काँग्रेस, भाजप, शिवसेना ठाकरे गट यांनी मोर्चेबांधणी करुन उमेदवारी अर्ज दाखल केले. सर्वच राजकीय पक्षांनी शेवटच्या दिवशीच (सोमवारी) उमेदवारी अर्ज दाखल केले. यात नायगाव बाजार समितीसाठी माजी आमदार वसंतराव चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव बेळगे, श्रीनिवास चव्हाण, संभाजी भिलवंडे, संजय शेळगावकर, शिवाजी बापूराव पवार, मधूकर राठोड, गणपतराव धुप्पेकर, सौ. निर्मलाताई मोहनराव धुप्पेकर यांच्यासह ३५ नामांकन दाखल करण्यात आले.
भाजपनेही आ. राम पाटील रातोळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शक्ती प्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज दाखल केले. यात भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलवंडे, शिवराज पा. होटाळकर, माणिक लोहगावे, शंकर कल्याण, उमाकांत देशपांडे, भगवान पा. लंगडापुरे, सौ.शोभाबाई विनायकराव शिंदे या प्रमुख उमेदवारासह ३७ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
कुंटूर बाजार समीतीसाठी तब्बल ९० अर्ज आले असून यात बालाजी मद्देवाड, दिलीपराव धर्माधिकारी, मनोज पाटील मोरे, प्राचार्य मनोहर पवार, सुर्यकांत कदम, प्रविण शिंदे, दत्ता आईलवार, सुधाकर बकवाड, प्रा. गोविंदराव परडे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे कुंटूर बाजार समितीच्या मैदानात शंकर आडकिने व मालू चंदर कांबळे हे दोन पत्रकारही उतरले आहेत.
नायगाव बाजार समितीसाठी काँग्रेस व भाजप कडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घाई चालू असताना माजी खासदार भास्करराव पा. खतगावकर हे आपल्या समर्थकासह उपस्थित होवून त्यांच्या गटाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. खतगावकर समर्थकांनी स्वतंत्र अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उमेदवारी दाखल करण्यात आली त्यावेळी माजी आमदार वसंतराव चव्हाण, माधवराव बेळगे, श्रीनिवास चव्हाण, विजय चव्हाण, संजय बेळगे, संभाजी भिलवंडे, मधूकर राठोड, संजय शेळगावकर, रवींद्र चव्हाण, मोहन पा. धुप्पेकर, दत्ता येवते, बालाजी बच्चेवार, विशाल शिंदे, श्रीहरी देशमुख, राहूल नकाते, अशोक पा. मुगावकर, महेश देशपांडे, सुरेश कदम, गणेश पवार, भाजप ता. अध्यक्ष कोंडीबा पाटील, बालाजी चिंतावार, एन. डी. पवार, साहेबराव पवार बालाजी चिंतावार, एन. डी. पवार, साहेबराव पवार, शिवाजी गायकवाड, शिवा पा. गडगेकर अदिसह काँग्रेस व भाजपचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
या दिग्गजांनी भरले अर्ज :- माजी आमदार वसंतराव चव्हाण, श्रीनिवास चव्हाण, शिवराज पा.होटाळकर, श्रावण पाटील भिलवंडे, माजी जि.प.सदस्य माणिक लोहगावे, काँग्रेसचे माजी ता. अध्यक्ष संभाजी भिलवंडे, सौ. शोभाताई विनायकराव शिंदे, बालाजी मद्देवाड, धर्माधिकारी, मनोज मोरे..
Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या