नायगाव नगरपंचायतच्या अध्यक्षपदी सौ.अर्चना संजय चव्हाण यांची बिनविरुद्ध निवड झाली !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी अर्चना संजय चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नायगाव शहराच्या नगरपंचायतची निवडणूक झाली तेव्हा अध्यक्षपद हे खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव सुटले होते. खुल्या महिला प्रवर्गातून तीन महिला असल्यामुळे मा.आमदार वसंतराव पाटील चव्हाण यांनी अडीच वर्षाचा कालावधी तीन महिलांमध्ये भागून देण्याचे ठरवले त्या दृष्टीने प्रथम नगराध्यक्ष म्हणून गीताताई नारायण जाधव यांनी दहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केला यानंतर मीनाताई सुरेश पाटील कल्याण यांनी दहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केला आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे मा.आमदार वसंतराव पाटील चव्हाण साहेब यांनी आज प्रभाग क्रमांक 13 मधून निवडून आलेल्या अर्चना संजय चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात केली.
आजच्या या अध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून एस.डी.एम.गिरी साहेब व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भगत मॅडम यांनी निवडणूक प्रक्रिया पार पडली.
निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आमदार वसंतराव चव्हाण साहेबांना अर्चना चव्हाण यांना अध्यक्षाच्या खुर्चीवरती बसून त्यांचे शेतकऱ्यांनी सन्मान केला यावेळी मित्र मंडळाच्या वतीने आणि अध्यक्ष च्या वतीने माजी आमदार वसंतराव चव्हाण साहेबांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला. यावेळी युवा नेते रविंद्र पाटील चव्हाण,हनमंतराव पाटील चव्हाण, माधवआप्पा बेळगे,श्रीनिवास चव्हाण, विजय पा.चव्हाण,संजय आप्पा सुरेश पा. कल्याण, नारायण जाधव, पंढरी भालेराव, रमेश पा.शिंदे, शरद भालेराव,पांडुरंग चव्हाण,माणिक चव्हाण,विजय भालेराव,विठ्ठल बेळगे बालाजी शिंदे,नावनाथ जाधव,साईनाथ चनावार, समीरभाई, मा.आमदार वसंतराव पा. चव्हाण मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते सर्व काँग्रेस पक्षाचे नगरसेवक काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या