नायगांव नगरपंचायतीचा भोंगळ कारभार – गजानन पाटील चव्हाण

नायगांव प्रतिनिधी :- दि. ३० जुन नायगांव ( खै )
नगरपंचायतीचे माजी भाजपा नगरसेवक / प्रतिनिधी तथा नांदेड जिल्ह्यातील युवा नेतृत्व गजानन पाटील चव्हाण नायगांवकर यांनी आज नायगांव शहरातील विठ्ठल नगर येथील सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ यांच्या राहत्या कुंटूबाच्या घरासमोर  नाली ची पाहणी केली.
नायगांव नगरपंचायतीने नालीचे निमित्त लावून खोद काम केले आहे, ते खोदकाम करून जवळपास दिड महीना झाला असुन नालीच्या निमित्ताने केलेला खड्डा हा शिवानंद पांचाळ यांच्या कुंटूबासाठी / वयोवृध्द, किंवा लहान मुलां बाळांसाठी घातक ठरला आहे.
 जमीन काळी मातीची आहे ,सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने त्या खड्यात पाणी जमा झाले असुन त्या खड्यात असंख्य मच्चर व ईतर जंतू निर्माण झाले आहेत.
त्यामुळे शिवानंद पांचाळ यांच्या व यांच्या जवळील असलेल्या शेजारी कुंटूबीयांना या कोरोना महामारीच्या काळात अनेक आजारांना पुढे तर जावेच लागेल पण या खड्यात लहान मुलं- बाळं दुदैवाने जर पडले, किंवा वयोवृध्द असलेल्यांचा पाय निसटला अन् त्या खड्यात पडुन त्यांची जिवित हानी झाल्यास कोण जबाबदार राहणार आहे? असा सवाल गजानन पाटील चव्हाण यांनी या वेळी उपस्थित केला आहे.
हा नायगांव नगरपंचायतीचा हलगर्जीपणा आहे असे ही व्यक्तव्य केल आहे. सदरील नालीची पाहणी करून नायगांव नगरपंचायतीच्या संबधीत असलेल्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे संपर्क साधून सदरील घातक असलेल्या नालीची माहिती देऊन तात्काळ नालीचे काम पूर्ण करून द्यावे अशी मागणीही चव्हाण यांनी केली आहे.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या