नायगाव पंचायत समितीच्या दहा गणाची आरक्षण सोडत जाहीर !

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव पंचायत समिती कार्यालयाच्या कै.बळवंतराव चव्हाण सभागृहामध्ये गुरूवारी सायंकाळी ४:०० वाजताच्या दरम्यान नायगाव पंचायत समितीच्या दहा गणाची आरक्षण सोडत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडली यामध्ये नरसी, मुगाव, मांजरम, टेंभुर्णी, बरबडा, कुष्णूर, कुंटूर ,देगाव,राहेर आणि घुंगराळा गणाचा समावेश आहे.
गण निहाय आरक्षण पुढील प्रमाणे:- 
नरसी हा गण सर्वसाधारण, मुगाव  हा गण सर्वसाधारण महिला, मांजरम हा गण अनुसूचित जाती जमाती साठी राखीव, टेंभुर्णी हा गण सर्वसाधारण महिला, बरबडा अनुसूचित जाती महिला, कुष्णुर सर्वसाधारण, कुंटुर हा गण अनुसूचित जमातीसाठी, देगाव हा गण ओबिसी महिला, राहेर हा गण सर्वसाधारण महिला, घुंगराळा हा गण ना.म.प्र राखीव करण्यात आला आहे.
आरक्षण सोडतीचे महत्त्वपूर्ण कार्य उपविभागीय अधिकारी तथा नियंत्रक अधिकारी सचिन गिरी, प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार गजानन शिंदे, यांनी पार पाडले यावेळी नायगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाजे, नायब तहसीलदार डि.डी.लोंढे, आर.जी.चव्हान, एस.एल. हदेश्वर व शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र भिलंवडे, परमेश्वर पाटील धानोरकर, युवराज पाटील, काहाळ्याचे उपसरपंच नागेश पाटील, आनंदराव पा. बावणे, मनोज पा.शिंदे, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष किरण कदम, जगनाथ पा.बावणे, अवकाश धुप्पेकर, गगाधर कोत्तेवार यांच्या सह विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 
       कार्यक्रमात नायगाव गणाच्या आरक्षण सोडतीवेळी चिठ्या टाकण्यात आल्या, यामध्ये लहान मुलांच्या हाताने आरक्षण सोडतीची चिठ्ठी काढण्यात आली.
जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत नांदेड येथे काढण्यात आले यात नायगाव तालुक्यातील पाच गटाचे आरक्षण पुढील प्रमाणे नरसी गट सर्वसाधारण महीलेसाठी तर बरबडा ओबीसी साठी, माजंरम ओबीसी साठी, देगाव अनुसूचित जाती जमाती साठी, तर बरबडा हा ओबीसी साठी राखीव झाल्याने तालुक्यातील अनेक ईच्छुक उमेदवाराच्या मना प्रमाणे आरक्षण सोडत झाली नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला असुन पाच गटापैकी नरसी हे एकमेव गट ओपन महीलेसाठी सुटल्याने येथे उमेदवाराची गर्दी होणार असल्याचे अंदाज दिसून येत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या