नायगाव तालुक्यात बंद व चक्काजामला शंभर टक्के प्रतिसाद

 [ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
सकल मराठा संघटनेच्या वतीने नायगाव तालुका बंद व चक्काजामच्या आदेश दिल्यावर नायगाव तालुक्यात मुख्य रस्त्यावर जागोजागी समाज बांधवांनी टायर जाळून रस्ता रोखला चक्काजाम केला व बाजारपेठ बंद करून शासनाच्या विरोधात सकल मराठा समाजाच्या बांधवांनी घोषणाबाजी केली.
नायगाव व नरसी शहरात व्यापाऱ्यानी आपली प्रतिष्ठान बंद करून शाळा महाविद्यालय बंद ठेवून बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला तर हेडगेवार चौक येथे शेतकऱ्यांनी बैलगाडी अडवून व नरसी मुख्य पोलीस चौकी जवळ चक्काजाम केला मराठा समाज बांधवांनी चौकात धरणे आंदोलन देऊन चक्काजाम केला.

तालुक्यातील राज्य सरकार मराठा आंदोलनाची दखल न घेतल्याने मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांचे नावाची घोषणा देत निषेध नोंदवण्या बरोबर सरकार विरोधी घोषणाबाजी करण्यात आली मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणा दरम्यान झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नायगाव तालुका बंद व चक्काजाम 11 सप्टेंबर सोमवार रोजी पहाटे सहा वाजल्यापासून नांदेड हैदराबाद महामार्गावर नायगाव तालुक्यातील कहाळा, कृष्णर , बरबडा, घुंगराळा, कुंटूर फाटा, टाकळगाव पळसगाव , नायगाव हेडगेवार चौक ,खैरगाव, होटाळा, नरसी, राहेर , कोलंबी ,मांजरम, गडगा शंकरनगर आदी तालुक्यातील बऱ्याच गावात सरकारच्या विरोधात विरोधात तीव्र घोषणाबाजी देत बाजारपेठ व शाळा महाविद्यालय बंद ठेवून चक्काजाम केला.

नायगाव तहसील कार्यालयासमोर सराटे जालना येथील मराठा क्रांतीचे मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून आम्हाला उपोषणासाठी बसलेले गजानन पाटील कदम, सतीश पाटील कदम सोमठाणकर यांचे तब्येत खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले नायगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर मॅडम व सहाय्यक पोलीस निरीक्षक बाचावार, हेड पोलीस कॉन्स्टेबल वळगे यांच्या सह पोलीस कर्मचाऱ्यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या