विविध मागण्यासाठी कष्टकरी संघटनेचा मोर्चा तहसीलवर धडकला.

नायगाव ता.प्रतिनिधी.
………………………………
शेतीचे कंपनीकरण व कंत्राटीकरण करणारे शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करण्यासाठी व विविध मागण्यासंदर्भात आज कष्टकरी संघटनेचा मोर्चा नायगाव तहसील कार्यालयावर कॉ. अरविंद देशपांडे, कॉ. देवराव आईलवार यांच्या नेतृत्वाखाली धडकला आहे.
केंद्र सरकारने अलीकडील काळात कृषी विषयक कायदे केले असून ते संपूर्ण शेतकरीविरोधी असून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमधून हुस्काऊन लावण्याचे कारस्थान असल्याने कष्टकरी संघटनेच्या वतीने दिनांक 22 ऑक्टोबर रोजी शहरातील पाटबंधारे विभाग पासून हेडगेवार चौक, बस स्टॅन्ड ते तहसील कार्यालयावर कृषी मालाचे निमत्तम समर्थन मूल्य मध्ये वाढ करावी, लाकडाऊंन काळात कृषी पंपाची विद्युत देयके माफ करावी, अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करून पन्नास हजाराची मदत करावी, ऑनलाइन शिक्षण पद्धत बंद करा, पाणी वितरण संस्था बंद करून सरकारी यंत्रणेमार्फत देण्यात यावे, अशा अनेक मागण्या घेऊन कष्टकरी संघटनेचा मोर्चा प्रचंड घोषणा देत नायगाव तहसील कार्यालयावर धडकला आहे, तहसीलदार शिंदे यांना मागण्यांचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी दिल्यानंतर आपल्या भावना व मागण्या शासनास कळविल्या जातील असे ते म्हणाले, यावेळी कां, अरविंद देशपांडे, कॉम्रेड देवराव आईलवार, कॉम्रेड किशनराव देशमुख, माधव ऐंजपवाड, हनुमंत हांडे, धोंडीबा वाघमारे आनंदराव पा. शहापुरे, गंगाधर गोणेवाड, बाबुराव सूर्यकार, शाहीर बाबुराव यांची यावेळी उपस्थिती होती.

ताज्या बातम्या