महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डीएनई -136 च्या नायगाव तालुका अध्यक्षपदी टि.जी पाटील रातोळीकर तर सचिवपदी सूर्यकांत बोन्डले यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची घोषणा बैठकीत करण्यात आली.
नायगाव तालुक्यातील ग्रामसेवक /ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची बैठक दि. २४ जानेवारी रोजी पंचायत समिती सभागृह नायगाव येथे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धनंजय वडजे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सचिव हनमंत वाडेकर, कार्याध्यक्ष श्रीनिवास मुगावे, धम्मानंद धोत्रे,के.व्हि.बिडवे यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. सदरील सभेत नायगांव तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष टि.जी.पाटील रातोळीकर यांच्या मागील आठ वर्षातील यशस्वी कामाची नोंद घेत त्यांनी संघटन कौशल्य गुणाची नोंद जिल्हा संघटनेने घेऊन पुन्हा नायगाव तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी टि.जी.पाटील रातोळीकर यांना दिल्याचे जिल्हा अध्यक्ष धनंजय वडजे यांनी सांगितले. तर सचिवपदी सूर्यकांत बोन्डले, कार्याध्यक्षपदी राजू मदेवाड, कोषध्यक्ष नागेश यारसणवार, मानद अध्यक्ष साईनाथ चव्हाण, उपाध्यक्ष संदीप मोरे,मिलिंद जोंधले, प्रल्हाद गोरे,अशोक कदम,व्हि.व्हि.यरपलवाड, संघटक – सदाशिव आगलावे,मोहन आडकीने, नामदेव माने, सल्लागार – डी एल वाघमारे, निलेश कुलकर्णी, कोंडावर, महिला उपाध्यक्ष शारदा भांजे, महिला संघटक अलका मुगटकर, प्रसिद्दीप्रमुख – गजानन इबिते, सदस्य – श्रीनिवास संगेवार, प्रकाश वाघमारे. कैलास बोधले यांची निवड करण्यात आली.
या प्रसगी श्रीनिवास मुगावे, बिलोली संघटना अध्यक्ष धम्मा धोत्रे, जिल्हा संघटनेचे पदाधिकारी एम एम शेख, विद्या मोरे, धनराज केते, हणमंत पा शिंदे, व्यंकटेश पाटील, गणेश बरबडेकर, बी. जी. रातोळीकर, शेख मुर्तुजा, निलेश कुलकर्णी, अशोक कदम, संदीप मोरे,अंकुश मोरे,प्रकाश वाघमारे, सुजाता शिंदे, अर्पणा बिजेवार, संगीता गुट्टे, दत्ता रेड्डेवाड, सदाशिव आगलावे, यादव सुर्यवंशी, नागोराव सुर्यवंशी, कानगुले विठ्ठल, शरद लाडेकर, कैलास बोधले, विनोद झुजुरे सह तालुक्यातील ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्तिती होती. नवनिर्वाचित पदाधिका-यांचे जिल्ह्यातील पदाधिका-यांकडुन सत्कार करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy