नायगाव तालुका आरोग्य विभागातर्फे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम.

● अभियानाला नागरिकांनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यात शासन आपल्या दारी या महत्वकांक्षी योजनेला सुरुवात झाली असून या योजनेअंतर्गत विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती गावातील जनतेला घरोघरी जाऊन दिली जावी या उद्देशाने नायगाव तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र तसेच गाव स्तरावर उपस्थित पात्र लाभार्थ्यांना लाभाविषयी माहिती घरोघरी जाऊन दिली जात आहे. त्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य विषयी च्या समश्या सोडवणे, समस्येचे निराकरण करणे आदी जनजागृती केली जात आहे.
  ‘शासन आपल्या दारीं’ या योजनेमार्फत नागरिकांना आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड (आभा) प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, जननी शिशु सुरक्षा योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, 102 मोफत संदर्भ सेवा इत्यादी सर्व योजनाबाबतची माहिती आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत घरोघरी जाऊन दिली जात आहे.
तसेच जे लाभार्थी आरोग्य योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत त्यांचा घरोघरी जाऊन सर्वे करून माहिती गोळा करण्यात येत असून पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांची कागदपत्रे भरून घेतली जात असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत पटवेकर यांनी सांगितले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या