नक्षत्रा सब्बनवारचे निट परीक्षेत घवघवीत यश !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
 येथील नक्षत्रा सब्बनवार चे ℕ परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात 720 पैकी 649 गुण प्राप्त करत विशेष यश संपादन केले. 
   नक्षत्राचे प्राथमिक शिक्षण कुंडलवाडीत झाले असून माध्यमिक शिक्षण नांदेडच्या केंब्रिज विद्यालयातून शिक्षण झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण बरबडा येथील झाले.
नक्षत्रा ही यशाचे श्रेय आज्जी, माजी नगरसेविका श्रीमती कुसुम सब्बनवार, आई सारिका, वडील राजेश सब्बनवार यांना दिले आहे. नक्षत्राच्या यशाबद्ल काका, काकु डॉ अश्विनी, प्रशांत सब्बनवार, प्रेक्षा अभिजीत सब्बनवार आत्या सौ.रजिंता महेश अनमल यांनी विशेष अभिनंदन केले. नक्षत्रा ही माजी उपाध्यक्ष कै गंगाधरराव सब्बनवार यांची नात आहे. या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या